जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात सर्वत्र अवकाळी पावसाचा कहर

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात काळ सायंकाळी सहाच्या सुमारास अवकाळी पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांची गहू,हरभरा,मका,ज्वारी.या रब्बी पिकांबरोबरच द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे.कोरोना विषाणूने आधीच कुक्कुट पालकांचे कंबरडे मोडले असताना हि दुसरी नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे.

हवामान खात्याने आगामी तीन दिवस पाऊस सांगितला असून या अवकाळी पावसाने मोठे नुकसान होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.देशभरात आधीच कोरोना या विषाणूने हाहाकार उदावलेला असल्याने शेतकऱ्यांचा शेतीमालाच्या भावाचा बोऱ्या उडाला असतानाच हि नवी अवकाळी पावसाची आपत्ती येऊन कोसळली आहे.देशातील नागरिकांना एकवीस दिवस बाहेर न पडण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले असतानाच या आपत्तीस शेतकऱ्यांनी कसे सामोरे जायचे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.कृषी व महसूल विभाग आधीच कोरोना या विषाणूने उडवलेल्या कहराने प्रशासनाने कामाला लावून दिला असताना हि समस्या कशी सोडवणार हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close