जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

ट्रकची टॅक्टरला धडक,ट्रॅक्टरचे तीन तुकडे,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यात ऊस वाहतुकीचे काम करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील निपाणी ता.पाचोरा येथील ट्रॅक्टरला ( क्रं.एम.एच.२९ टी.०८७६) यास समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने सिन्नर-शिर्डी रोडवर घारी शिवारात साई लॉन्स समोर जोराची धडक देऊन ट्रॅक्टरचे तीन तुकडे केले असून आपण गंभीर रित्या जखमी झालो असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात जगदीश हरी पाटील रा.आडगाव ता.चाळीसगाव यांने दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

संकल्पित छायाचित्र

वरील ट्रॅक्टरला जुगाड जोडून त्यात संवत्सर येथून ऊस भरून घेऊन जात असताना शिर्डी सिन्नर रस्त्यावरून घारी शिवारातून साई लॉन्स समोरून कोळपेवाडीकडे कडे जात असताना त्यास समोरून येणारा ट्रकने (क्रं.एम.एच.२९,टी.०८७६ ) रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून आपल्या ताब्यातील वाहन जोराने चालवून जोराची धडक दिली आहे,त्यात त्या ट्रॅक्टरचे तब्बल तीन तुकडे झाले आहे.व चालक गंभीर जखमी झाला आहे.

कोपरगाव तालुक्यातील शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना असून या साखर कारखाण्याचा गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे.त्यासाठी ट्रॅक्टर बैलगाड्या यांच्या माध्यमातून ऊस वाहतूक केली जाते.मंगळवार दि.०३ मे च्या पहाटे ०४.३० वाजता ट्रॅक्टर चालक हा नथू हरचंद पाटील निपाणी ता.पाचोरा जिल्हा जळगाव यांचा वरील क्रमांकाचा ट्रॅक्टरला जुगाड जोडून त्यात संवत्सर येथून ऊस भरून घेऊन जात असताना शिर्डी सिन्नर रस्त्यावरून घारी शिवारातून साई लॉन्स समोरून कोळपेवाडीकडे कडे जात असताना त्यास समोरून येणारा ट्रकने (क्रं.एम.एच.२९,टी.०८७६ ) रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून आपल्या ताब्यातील वाहन जोराने चालवून जोराची धडक दिली आहे,त्यात त्या ट्रॅक्टरचे तब्बल तीन तुकडे झाले आहे.व या अपघातात त्या ट्रॅक्टरवरील चालक जगदीश हरी पाटील याच्या उजव्या पायाला मोठी दुखापत झाली आहे.अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे.

दरम्यान अपघातानंतर जखमी ट्रॅक्टर चालकास नजीकच्या नागरिकांनी संत जनार्दन स्वामी रुग्णालायत त्यास उपचारार्थ दाखल केले आहे.त्याचे नातेवाईक आल्यावर त्यास शुद्ध येऊन त्याने कोपरगाव तालुका पोलिसांना जबाब देऊन या बाबत गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी याप्रकरणी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करुन आपल्या दप्तरी गु.क्रं.१६९/२०२२ भा.द.वि.कलम २७९,३३७,४२७,मोटर वाहन कायदा कलम १८४,१३४,(अ)(ब) १७७ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महेश कुसारे हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close