जाहिरात-9423439946
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अवघ्या महिनाभरात पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद पदरात पाडून घेत विधानभवनाच्या प्रांगणात आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडुन पद व गोपनीयतेची शपथ घेतली असली तरी आपल्या शिष्टमंडळासह नुकतेच राज्यमंत्री पदासाठी भेटलेले कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी या पाच वर्षात विधानसभेच्या कामकाजाचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला असल्याची व त्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला असल्याची माहिती हाती आली आहे.तर दुसरीकडे शिवसेनेने आ. शंकरराव गडाख यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे.
गत सप्ताहात नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कोपरगाव विधानसभा मतदार संघातून अटीतटीच्या निवडणुकीत निवडून आलेले आ. आशुतोष काळे यांनाही राज्यमंत्री पदाची अपेक्षा लागली होती.व प्रारंभी थोड्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना भेटण्याचा निर्णय घेतला होता.मात्र नंतर जवळपास पंचवीस-तीस कार्यकर्त्यांची यादी वाढतच गेली.व त्यांनी शरद पवारांच्या निवासस्थांनी प्रवेश केला असता तेथे उपस्थित असलेल्या चाणाक्ष शरद पवारांना हे शिष्ट मंडळ कशासाठी आले हे सांगण्याची गरज पडली नाही.त्यांनी लागलीच आपण पाहिल्यावेळी विधानसभेत निवडून गेलो त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला पहिल्यांदा पाच वर्ष विधानसभा समजावून घेण्याचा आग्रह धरत आपला पत्ता पहिल्या भेटीतच कट केला असल्याची आठवण करून देत अजून वेळ आली नसल्याचे सूचित केले.
राज्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज चौथ्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. सर्वप्रथम नोव्हेंबर २०१०, त्या नंतर ऑक्टोबर २०१२ आणि त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये अजित पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती.आज पार पडलेल्या शपथविधीत काहींच्या चेहऱ्यावर हसू तर काहींच्या चेहऱ्यावर आसूं असल्याचे पाहायला मिळाले असले तरी गत सप्ताहात नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कोपरगाव विधानसभा मतदार संघातून अटीतटीच्या निवडणुकीत निवडून आलेले आ. आशुतोष काळे यांनाही राज्यमंत्री पदाची अपेक्षा लागली होती.व प्रारंभी थोड्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना भेटण्याचा निर्णय घेतला होता.मात्र नंतर जवळपास पंचवीस-तीस कार्यकर्त्यांची यादी वाढतच गेली.व त्यांनी शरद पवारांच्या निवासस्थांनी प्रवेश केला असता तेथे उपस्थित असलेल्या चाणाक्ष शरद पवारांना हे शिष्ट मंडळ कशासाठी आले हे सांगण्याची गरज पडली नाही.त्यांनी लागलीच आपण पाहिल्यावेळी विधानसभेत निवडून गेलो त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला पहिल्यांदा पाच वर्ष विधानसभा समजावून घेण्याचा आग्रह धरत आपला पत्ता पहिल्या भेटीतच कट केला होता व आपणही तो आदेश शिरसावंद्य मानत पाच वर्ष विधानसभेचे कामकाज समजावून घेतले असल्याचे सांगितले गेल्यावर उपस्थित कार्यकर्त्यांना साहेबांचा रोख लागलीच ओळखू आला. त्यांनी मग समयसूचकता दाखवत मग पश्चिमेचे समुद्राला जाणारे ८० टी. एम.सी.पाण्याचा विषय छेडला व त्यावर शरद पवार यांनी,”आपण नगर जिल्ह्यात आल्यावर अधिकाऱ्यांची बैठक बोलावून हा विषय समजून घेऊन मार्गी लावण्याचा प्रयत्न करू” अशी बोळवण करून त्यांना आल्या पावली परत पाठवले असल्याची खात्री लायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे राहुरी तालुक्यातील राष्ट्रवादीचे आ.प्राजक्त तनपुरे यांचा राज्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मानले जात आहे.त्यांच्या मागे उपमुख्यमंत्री अजित पवार व अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आपली ताकत उभी केल्याचे मानले जात आहे.या घटनेने आ. काळे समर्थक कार्यकर्ते मात्र नाराज झाले असल्याची माहिती आली आहे.