जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

…शहाजापूर घटनेतील तो आरोपी अद्याप फरारच !

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथील अल्पवयीन मुलीस शाळा सुटल्यावर शुक्रवार दि.१३ डिसेंबर रोजी सांयकाळी पाचच्या सुमारास तिला पळवून नेऊन शहाजापूर शिवारातील निर्जन स्थळी असलेल्या पत्र्याच्या खोलीत रात्रभर तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी हा काल नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शहा,पंचाळे भागात असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती मात्र त्याचा सुगावा लागल्याने त्याने तेथून पलायन केल्याने पोलिसांना हात चोळत परतावे लागले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान आज दिवसभर प्रभारी विभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने हे तपासी अधिकारी असल्याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते.त्याच वेळी दुपारी एकच्या सुमारास आ. आशुतोष काळे यांनी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणी तपासाला वेग देण्याचे आदेश दिले आहेत.

कोपरगाव तालुक्यातील वेळापूर ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या व मजुरी करून आपला चरितार्थ चालविणाऱ्या कुटुंबातील नऊ वर्षाची अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यावर घरी न परतताच बेपत्ता झाल्याने वेळापूर परिसरात खळबळ उडाली होती.तिच्या नातेवाईकांनी आसपास नातेवाईक व ओळखीच्या माणसांकडे शोध घेऊनही ती मिळून न आल्याने तिच्या पालकांनी कोपरगाव तालुका पोलिसांकडे ती अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची तक्रार त्याच रात्री सव्वा दहाच्या सुमारास केली होती.त्यामुळे पोलीस अधिकारीही चक्रावून गेले होते.त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी चलचित्रणाच्या फिती तपासल्या असता ती एका तरुणाबरोबर एका दुचाकीवर पुढे टाकीवर बसून जात असल्याचे आढळून आले होते.त्या नंतर सदर मुलगी या आरोपीने सकाळी लासलगाव-शिर्डी रस्त्यावरील काळे सहकारी कारखान्याकडे जाणाऱ्या कमानिजवळ सोडून तो परागंदा झाला होता.त्यांनतर गायब मुलगी सापडल्यावर तिची वैद्यकीय तपासणी केल्यावर तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले होते.त्यांनतर आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी तीन पथके रवाना केली होती मात्र तो अद्याप सापडला नव्हता.मात्र आज तो कोळपेवाडी नजीक असलेल्या शहा,पंचाळे भागात असल्याची खबर मिळाली होती मात्र तेथून तो फरार झाल्याने पोलिसांची पंचाईत झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close