जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

शहाजापूरच्या ..त्या घटनेतील दोन संशयित ताब्यात, कोपरगाव पोलिसांची कारवाई

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथील अल्पवयीन मुलीस शाळा सुटल्यावर शुक्रवार दि.१३ डिसेंबर रोजी सांयकाळी पाचच्या सुमारास तिला पळवून नेऊन शहाजापूर शिवारातील निर्जन स्थळी असलेल्या पत्र्याच्या खोलीत रात्रभर तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी हा परागंदा असताना आज पोलिसांनी त्या गुन्ह्यात वापरलेली दुचाकींचा शहाजापूर येथील मालक गणेश गोपीनाथ शिंदे व मुख्य संशयित आरोपीचा पिता अशोक निमसे या दोघाना ताब्यात घेतले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान वेळापूर येथील नागरिकांनी आपले गाव बंद करण्याचा निर्णय घेतला असून आज त्या संबंधी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील वेळापूर ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या व मजुरी करून आपला चरितार्थ चालविणाऱ्या कुटुंबातील नऊ वर्षाची अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यावर घरी न परतताच बेपत्ता झाल्याने वेळापूर परिसरात खळबळ उडाली होती.तिच्या नातेवाईकांनी आसपास नातेवाईक व ओळखीच्या माणसांकडे शोध घेऊनही ती मिळून न आल्याने तिच्या पालकांनी कोपरगाव तालुका पोलिसांकडे ती अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची तक्रार त्याच रात्री सव्वा दहाच्या सुमारास केली होती.त्यामुळे पोलीस अधिकारीही चक्रावून गेले होते.त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी चलचित्रणाच्या फिती तपासल्या असता ती एका तरुणाबरोबर एका दुचाकीवर पुढे टाकीवर बसून जात असल्याचे आढळून आले होते.त्या नंतर सदर मुलगी या आरोपीने सकाळी लासलगाव-शिर्डी रस्त्यावरील काळे सहकारी कारखान्याकडे जाणाऱ्या कमानीं जवळ सोडून तो परागंदा झाला होता.त्यांनतर गायब मुलगी सापडल्यावर तिची वैद्यकीय तपासणी केल्यावर तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले होते.त्यांनतर आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी तीन पथके रवाना झालेली असताना तो सिन्नर तालुक्यातील शहा,पंचाळे परिसरात आढळल्याची व काही ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केल्याची माहिती हाती आली आहे.मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.त्यामुळे पोलिसांनी आता आपला मोर्चा त्याच्या नातेवाईकडे वळवला आहे.त्यासाठी संशयित आरोपीचा पिता अशोक निमसे यास पोलिसांनी काल सकाळी कोळपेवाडी येथील काळे सहकारी कारखान्याच्या यार्डातून ताब्यात घेतल्याची माहिती हाती आली असून आरोपीचे नातेवाईक कोठे-कोठे आहे.त्या जागा शोधण्याचे काम सध्या सूरु आहे.मात्र प्रमुख आरोपी अद्याप सापडला नसल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे.

दरम्यान वेळापूर येथील नागरिकांनी आपले गाव बंद करण्याचा निर्णय घेतला असून आज त्या संबंधी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close