जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

येसगाव शाळेस वर्षश्रद्धाचा निधी विद्यार्थी संगणकाकडे वळवला !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील कार्यकर्ते प्रताप लक्ष्मण दरेकर यांनी आपले पिताश्री कै.लक्ष्मणराव किसनराव दरेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ येणाऱ्या पारंपरिक खर्चाला फाटा देऊन त्यातून त्यांनी येसगाव येथील जिल्हा परिषद शाळेला शाळेस ३२ इंची एल.ई. डी. दूरदर्शन संच व पूर्ण संगणक संच संगणक टेबल आदी शालेयोपयोगी वस्तु देऊन नवीन प्रेरणादायी पायंडा पाडल्याने त्यांचे येसगाव परिसरात कौतुक होत आहे.

हिंदू सांस्कृतिक परंपरेने अगदी गावपातळीपर्यंत सुस्थिर अशी समाजरचना उभी करण्याचा यशस्वी प्रयत्‍न केला.माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे दाहकर्म व श्राद्ध हे संस्कार हिंदू जीवनशैलीत प्रचलित आहेत. दिवंगताविषयी आस्था, प्रेम, सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून दाहकर्म व श्राद्ध या विधींकडे पाहिले जाते. आज त्यावर अनेक मतमतांतरे आहेत.मात्र काही रुढीवादी आहेत तर काही या रूढींना कालबाह्य ठरवून सामाजिक प्रश्नाची जाणीव ठेऊन त्यास प्राधान्य देणारे विचार प्रवाह आहेत.त्यात प्रताप दरेकर यांचा समावेश करावा लागेल.

भारतीय विचारधारेत ईश्वर चराचरात अधिवासित तर आहेच पण ईश्वर अथवा ग्रंथ शब्द अशा कोणत्याही प्रामाण्यासोबतच व्यक्तीची व्यक्तिगत श्रद्धा आणि व्यक्तिगत मूल्ये यांवर आधारित, व्यक्तिगत कर्तव्य-धर्माच्या प्रामाण्याचेही प्राबल्य असल्याचे मानले जाते. सोबतच मोक्षप्राप्तीच्या हेतूने चार ऋणांतून मुक्तता; पितृ, मातृ,आणि गुरुजनांच्या आज्ञांचे पालन, व्यक्तिगत, व्यावसायिक, कौटुंबिक कर्तव्ये पार पाडणे, जातिसमूह आणि त्यांच्यांतील परंपरांचे जसेच्या तसे पालन करणे, आदी जीवन पद्धतीतून समतोल साधणे म्हणजेच धर्म अशी धर्माची वेगळी संकल्पना भारतीय विचारधारेत आढळते. हिंदू सांस्कृतिक परंपरेने अगदी गावपातळीपर्यंत सुस्थिर अशी समाजरचना उभी करण्याचा यशस्वी प्रयत्‍न केला.माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे दाहकर्म व श्राद्ध हे संस्कार हिंदू जीवनशैलीत प्रचलित आहेत. दिवंगताविषयी आस्था, प्रेम, सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून दाहकर्म व श्राद्ध या विधींकडे पाहिले पाहिजे असे वाटते. आज त्यावर अनेक मतमतांतरे आहेत.मात्र काही रुढीवादी आहेत तर काही या रूढींना कालबाह्य ठरवून सामाजिक प्रश्नाची जाणीव ठेऊन त्यास प्राधान्य देणारे विचार प्रवाह आहेत.त्यात प्रताप दरेकर यांचा समावेश करावा लागेल.समाजाला रुढीपेक्षा आज वर्तमान प्रश्नाला भिडणाऱ्या विचारवंतांची गरज आहे.त्यामुळे त्यांचे कार्य नाव विचारांशी जोडणारे असून त्याचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

त्या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा रमेश भालेराव,प्रताप लक्ष्मण दरेकर,दत्तात्रय दरेकर, कैलास दरेकर, त्यांच्या भगिनी रोहिणी थोरात,शाळेचे सर्व शिक्षक व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य हजर होते.त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close