नगर जिल्हा
साकुरीत संस्थाचालकाकडून सत्तेचाळीस लाखांची फसवणूक !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील साकुरी ग्रामपंचायत हद्दीतील नगर मनमाड रस्त्यालगतच्या साईदत्त अर्बन मल्टिपल निधी संचालक मंडळाकडून या परिसरातील दैनदिन बचत ठेव व मुदत ठेव योजनेचे खातेदार यांचे अंदाजे सत्तेचाळीस लाख रुपयांची फसवणूक करून संस्थेचे अध्यक्ष नितीन थोरात यांनी पलायन केले असल्याची खात्तीलायक बातमी हाती आली आहे. या बाबतचे सविस्तर वृत्त असे की,ऐन दुष्काळात साकुरी येथील साईदत्त अर्बन मल्टिपल निधी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन थोरात व सुरेश नाथजी थोरात, मनीषा सुरेश थोरात सर्व रा.वार्ड क्र १,आखाती कॉलनी श्रीरामपूर आणि सतीश केशवराव जाधव,अनिल केशवराव जाधव ,केशव गोविंदराव जाधव सर्व रा.पुणतांबा,ता राहाता यांनी जाहिरातबाजी करून राहता परिसरातील दैनिक बचत ठेव प्रतिनिधी व खातेदार व मुदत ठेव योजनांचे खातेदार यांना अमिश दाखवून ऑक्टोम्बर १८ ते एप्रिल १९ या कालावधीमध्ये लाखो रुपयांच्या ठेवी बँकेत जमा करून घेतल्या ,मात्र अडचणीचे वेळेत खातेदारांना पैसे काढण्याची वेळ आल्यानंतर नितीन थोरात यांचेकडून आता पॆसे शिल्लक नाही असे उडवाउडवीची उत्तरे वारंवार दिली.पैसे मिळालेच नाही,आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच संदीप गोर्डे व दैनिक ठेव प्रतिनिधी यांनी अहमदनगर येथे जाऊन आर्थिक गुन्हा अन्वेषण विभाग यांचेकडे तक्रार केली.तेथील विभागीय पोलीस अधिकारी सोनवणे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली पो .स .ई मातोंडकर यांनी तक्रार नोंदवून घेऊन ती राहाता पोलिस स्टेशनला वर्ग केली आहे.असे असतांना राहाता पोलीस ठाण्याचे पो.नि.अरुण परदेशी यांचेकडून नितीन थोरात यांना ग्राहकांचे पैसे देण्यासाठी काही दिवसांची मुदत द्यावी लागेल असे अनाहूत सल्ला देण्यात आला आहे.त्यानुसार थोरात यांनी १६ व ३०ऑगस्ट ची मुदत दिली,मात्र तरीही रक्कम मिळाली नाही.
दरम्यान या संबंधी आमच्या प्रतिनिधीने राहाता पोलीस ठाण्यात या बाबत चौकशी केली असता अद्याप असा गुन्हा इकडे वर्ग झाला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
त्या नंतर शिर्डी विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचोरे यांचे आदेशानुसार राहाता पो .स्टेशनचे पो.नि.अरुण परदेशी यांनी दि १९ऑगष्ट रोजी संदीप गोर्डे यांचे फिर्यादीनुसार गु.क्रं. ०१९१ नुसार राहता पोलिस स्टेशनला भा.द.वि.कलम ४२०,४०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र १५ दिवस उलटूनही आरोपीस अद्याप अटक झाली नाही हे विशेष ! आरोपीस अटक व पुढील कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा दैनिक बचत ठेव प्रतिनिधी ,व खातेदार ,मुदत ठेव योजना खातेदार यांनी दिला आहे.