जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

“त्या” बदनामी बदल आपल्याला खेद-प्राचार्य अनाप

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

लोहगाव-( वार्ताहर)

राहता तालुक्यातील प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात सहा सप्टेंबर रोजी वडाच्या फांद्या काढताना दुर्दैवी घटना घडली त्यात एकाचा अंत झाला परंतु अतिशय चुकीच्या पद्धतीने शाळेची बदनामी करण्याची काही काही सामाजिक संकेतस्थळावर संभ्रम निर्माण केला.या बातम्या आणि त्यातून शाळेची व आपली बदनामी झाल्याचा खेद विद्यालयाचे प्राचार्य मधुकरराव अनाप यांनी नुकताच व्यक्त केला आहे.

या विशाल वटवृक्षाला आपण खूप जपलेले असून सातत्याने काळजी घेत आहोत. त्याच्या सुद्धा काही फांद्या किंवा पारंब्या जर एकदमच खाली आल्या आणि धोकादायक वाटल्या तर यापूर्वीही अनेक वर्षांपासून सर्वांच्या संमतीने त्या काढल्या गेलेल्या आहेत आणि ते सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असते परंतु आज मात्र आपण या वटवृक्षाची एकही फांदी काढलेली नाही.तो जसा आहे तसाच डौलाने व दिमाखाने उभा आहे-प्राचार्य अनाप

याबाबत सविस्तर वृत्त असे की,मागील तीन-चार दिवसांपासून शालेय परिसरातील धोकादायक झाडांच्या फांद्या शाळा व्यवस्थापनाने नियमानुसार काढल्या असतानासुद्धा काही असामाजिक तत्त्वांनी संभ्रम निर्माण होईल अशा पद्धतीने सामाजिक संकेतस्थळावर बातम्या पसरवल्या आहेत. त्यातून आपली व संस्थेची बदनामी झाली करण्याचा प्रयत्न केला आहे याचे आपल्याला अतिशय दुःख होत आहे.जे धोकादायक आहे ते सर्व नियमांना बांधील राहून व प्रशासकीय घटकांच्या सर्व संमतीने करणे हेही माझे कर्तव्यच आहे.आणि त्यातूनच जे केले आहे ते विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाचे होते.ज्या माजी विद्यार्थी,या विद्यालयाची माजी रयत सेवक व माझे किंवा आपल्या सर्वांचे शिक्षक,पालक आणि हितचिंतक यांना हे समजले त्या सर्वांनी याची शहानिशा केली आणि आपल्याला दूरध्वनी तसेच प्रत्यक्ष भेटून पाठबळ दिले असून यात चुकीचे काही नाही असा अभिप्राय दिला. त्याबद्दल आपण या सर्वांचे आभारी आहे.आपल्या या विश्वासावरच आपण सेवानिवृत्त होऊन या विद्यालयासाठी तनमनधनाने सातत्याने काम करत राहणार आहे.चुकीच्या माहितीमुळे आपणा सर्वांना जो काही त्रास होऊन त्या क्षणापुरती का होईना माझ्याविषयी वेगळी भावना निर्माण झाली असेल त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो.

विद्यालयाचे प्राचार्य अनाप हे प्रतिक्रिया देताना पुढे म्हणाले की,”येथे शाखाप्रमुख असलो तरी आपणा प्रमाणेच या विद्यालयाचे आपणही माजी विद्यार्थी आहे.त्यामुळे तुमच्या ज्या भावना आहेत त्याच आपल्याही आहेत.आणि म्हणूनच ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेचा शाखाप्रमुख म्हणून आपल्याला जी संधी मिळाली त्या संधीचे सोने करण्यासाठी आपण अहो रात्र झटत आहे. विद्यालयाची गुणवत्ता आणि शिस्त ही परंपरा आहे आणि त्यामुळेच आजही जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील विद्यार्थी येथे प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतात.यासाठी जास्तीत जास्त शैक्षणिक व भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत आहे याकामी आपल्या सर्वांची,पालक,विद्यार्थी व हितचिंतकांची मला अतिशय मोलाची साथ मिळालेली आहे या सर्वांचे आपण सतत ऋणी राहू.आपल्या सर्वांचं दैवत,रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक,डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे अभिवादन स्थळ दर्शनी भागातच असलेल्या विशाल वटवृक्षाच्या छायेत आहे.त्याचे सुशोभिकरण करण्याचं काम आपण सातत्याने करत आहे हे आपण पाहात आहातच. या ठिकाणी आल्याबरोबर आपण नतमस्तक होतो.येथे आपल्या भावना गुंतलेल्या आहेत.त्याला तडा जाणार नाही याची सातत्याने काळजी घेत आहे.याशिवाय आपण आपल्या कार्यकाळात प्रवेश द्वारापासून तर शेवटच्या टोकापर्यंत सातत्याने नवनवीन वृक्षलागवड व बगीचे तयार केलेले आहेत जे कोणी संकुलात अलीकडच्या काळात येऊन गेले असेल त्यांनी ते पाहिले असेलच. आणि सातत्याने आपण त्याची देखभाल ही घेत आहे.जे जे करणे गरजेचे आहे असेआपल्याला वाटले ते शाळा समिती व संस्थेच्या परवानगीने आपण केलेले आहे करत आहे.तरी आपणास सर्वांना विनंती आहे की,कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती सामाजिक संकेतस्थळांवर मार्फत आली तर आपण त्याची शहानिशा करूनच आपले मत व्यक्त करावे. व खरी माहिती आपल्या इतर वर्ग मित्रांना वेळोवळी कळवावी.आपल्या भावनांना सेवा निवृत्त होई पर्यंत कुठेही तडा जाणार नाही याची आपण खात्री देतो असे प्राचार्य अनाप यांनी आश्वासित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close