जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

बाबासाहेब पावसे यांना पुरस्कार जाहीर

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

अहमदनगर-(प्रतिनिधी)

राज्यस्तरीय शिवछत्रपती समाजरत्न जीवनगौरव पुरस्कार सरपंच सेवा संघाचे संस्थापक राज्य सरचिटणीस बाबासाहेब यादवराव पावसे रा. हिवरगांव पावसा ता. संगमनेर यांना नुकताच संजीवनी विकास संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सानप यांनी जाहीर केला आहे.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ग्रामविकासात व सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून समाजाची सेवा करत राज्यभरातील सर्व सरपंचांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्याचा प्रयत्न करणारा युवा सामाजिक कार्यकर्ता तसेच पत्रकारीतेच्या क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत असून सर्व सामान्य माणसाला मदत होईल व शेतकरी वर्गाला विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा “मान नेतृत्त्वाचा सन्मान कतृत्वाचा” शिवछत्रपती गुणीजन गौरव महासंमेलन २०२० हा सोहळा लवकरच संपन्न होणार आहे. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहे.त्या वेळी हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे.सामाजिक क्षेत्रात लक्षवेधी कार्य करणाऱ्या आदर्श तसेच ग्रामविकासात व सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून समाजाची सेवा करत राज्यभरातील सर्व सरपंचांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्याचा प्रयत्न करणारा युवा सामाजिक कार्यकर्ता तसेच पत्रकारीतेच्या क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत असून सर्व सामान्य माणसाला मदत होईल व शेतकरी वर्गाला विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. संजीवनी विकास संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी सामाजिक राजकीय शैक्षणिक तसेच पत्रकारीता अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते या वर्षी चा राज्यस्तरीय पुरस्कार श्री पावसे यांना संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सानप सचिव गोरक्ष भवर यांनी नुकतीच एक पत्रकाद्वारे जाहीर केला आहे. सदर पुरस्कारा मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close