जाहिरात-9423439946
कृषी विभाग

डाळिंबाची व्यापाऱ्यांनी सुरु केली लूट !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

डाळिंबाचे यंदा चांगले उत्पादन झाले असल्याने सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात डाळींब पाहायला मिळत आहेत.मात्र डाळिंबांना पाहिजे तसा उठाव मिळत नसल्याने डाळिंबाचे दर मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत.यावर्षी पहिल्यांदाच डाळींब ४० ते ७० रुपये किलो दराने घाऊक बाजारात विकावे लागत आहे तर शिवार खरेदीत व्यापारी लुटत असल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे सार्वत्रिक चित्र दिसून येत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे.

या बाबत आमच्या प्रतिनिधीने शेतकरी सचिन कोळपे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”डाळिंबाला सहा महिन्यात एकरी एक लाख रुपये खर्च येत असताना त्यातून एकरी दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षीत असताना त्यातून खर्चही निघत नसल्याची माहिती दिली असून शिवार खरेदीत व्यापारी हि लूट करीत असून त्यावर बाजार समित्यांचे नियंत्रण नसल्याचा आरोप केला आहे”.

या वर्षी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने लालबुंद डाळिंबांचा हंगाम लवकर सुरू झाला आहे. आता मुंबई,दिल्ली,सुरत,स्थित घाऊक फळबाजारात डाळींब पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या कोपरगाव परिसरातही दररोज डाळींब येत असल्याची नोंद घाऊक फळबाजारात होत आहे.पाऊस चांगला झाला असल्याने उत्तम दर्जाची लाल,टपोऱ्या दाण्यांची डाळींब बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.मात्र यंदा तेल्या रोगाचा डाळिंबावर मोठा प्रादुर्भाव झाल्याने त्यावर मोठया प्रमाणावर डाग असल्याने दर मोठ्या प्रमाणावर कोसळले आहे.हे दर इतक्या नीचांकी पातळीवर कोसळले आहे की ते शेतकऱ्यांना बाजारापर्यंत आणणे परवडणारे राहिले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांत मोठी नाराजी पसरली आहे.कोळपेवाडी येथील शेतकरी सचिन नामदेव कोळपे यांनी कोपरगाव येथील बाजार समितीत नुकतेच आपले सोळा डाग डाळिंब नेले असता त्यांना एकूण ११५१ रुपयांपैकी तोलाई-११.३८ तर क्रेट भाडे-८०,हमाली-१६०,इतर-०.६२ वजा जाता केवळ हातात ६१२ रुपये हातात आले आहेत.हीच अवस्था बाकी शेतकऱ्यांची झाली आहे.त्याना ५० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत नीचांकी दर मिळाला आहे.

दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने बाजार समितिचे उपसभापती राजेंद्र निकोले यांच्याशी संपर्क साधला असता,”वर्तमानात डाळीबांचे दर सर्वत्र कोसळले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना डाळिंब शेती परवडत नसल्याची कबुली दिली असून तेल्या रोगाचा प्रादुर्भाव व कोरोना विषाणूंचा हि दुष्परिणाम झाला” असल्याचे म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close