जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

आकारी पडीत जमीन मालकांच्या आशा झाल्या पल्लवित

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्य सरकारने १९१८ साली शेतकऱ्यांचा आकार थकीत जमिनी ताब्यात घेऊन शतकाचा कालावधी उलटून जाऊनही त्या शेतकऱ्यांच्या जमिनी अद्याप त्यांना मिळालेल्या नाही त्या प्राप्त करण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील ९ गावातील आकारी पडीक शेतकऱ्यांच्या वारसांच्या वतीने जयदीप गिरीधर आसने इतर शेतकऱ्यांनी विधीज्ञ अजित काळे यांच्या मार्फत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका (क्रमांक.१२५६३/२०२०) दाखल केल्याने या शेतकऱ्यांच्या वर्षांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

सन-१९१८ साली तत्कालीन सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव,श्रीरामपूर व नेवासा आदी तालुक्यातील ९ गावातील शेतकऱ्यांच्या ७३६७ एकर जमिनी इंग्रज सरकारने ३० वर्षाच्या कराराने ताब्यात घेतल्या होत्या. हा करार येवला येथे संपन्न झाला होता. त्या जमिनी २३ जुलै १९२० रोजी इंग्रज सरकारने दि. बेलापूर कंपनी इंडस्ट्रीज लिमिटेड हरेगाव या कंपनीकडे कसण्यासाठी वर्ग केल्या होत्या.या क्षेत्राला हरेगाव मध्ये वर्ग करून त्याचे हे ए.बी.सी.असे तीन वर्ग निर्माण करण्यात आले होते.पुढे कंपनीचे नाव कमी करून सरकारने या जमीन या शेतकऱ्यांना पुन्हा आपल्या ताब्यात न देता शेती महामंडळाकडे कसण्यासाठी वर्ग करून या शेतकऱ्यांवर अन्याय केला होता.आता अड्.अजित काळे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात हा प्रश्न गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,सन-१९१८ साली तत्कालीन सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव,श्रीरामपूर व नेवासा आदी तालुक्यातील ९ गावातील शेतकऱ्यांच्या ७३६७ एकर जमिनी इंग्रज सरकारने ३० वर्षाच्या कराराने ताब्यात घेतल्या होत्या. हा करार येवला येथे संपन्न झाला होता. त्या जमिनी २३ जुलै १९२० रोजी इंग्रज सरकारने दि. बेलापूर कंपनी इंडस्ट्रीज लिमिटेड हरेगाव या कंपनीकडे कसण्यासाठी वर्ग केल्या होत्या.या क्षेत्राला हरेगाव मध्ये वर्ग करून त्याचे हे ए.बी.सी.असे तीन वर्ग निर्माण करण्यात आले होते. पुढे भारत देश स्वतंत्र झाला.१९६५ मध्ये कंपनीचे नाव कमी करून सरकारने या जमीन या शेतकऱ्यांना पुन्हा आपल्या ताब्यात न देता आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. या जमिनी पुढे शेती महामंडळाकडे कसण्यासाठी वर्ग करण्यात आल्या होत्या. त्या आजतागायत शेती महामंडळाकडेच पडून आहे.त्यामुळे ९ गावातील आकारी पडीक शेतकऱ्यांच्या वारसांच्या वतीने जयदीप गिरीधर आसने व इतर यानी विधीतज्ञ अजित काळे यांच्यामार्फत एक जनहित याचिका (क्रं.१२५६३/२०२०) उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

आकारी पडीत जमिनीच्या प्रश्नांचा वापर करून या शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम अनेकांनी करून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे.म्हणून या प्रश्नावर या शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचा निर्णय नुकताच घेऊन निळवंडे धरणाच्या सात तालुक्यातील लाभक्षेत्रातील १८२ दुष्काळी शेतकऱ्यांना निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने न्याय देण्यात अद्याप पर्यंत प्रमुख भूमिका निभावणारे वकील अजित काळे यांचेकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.या प्रश्नी अड्,अजित काळे यांनी या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

या जमिनी आकारी पडीक शेतकऱ्यांच्या वारसांना परत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने न्यायालयात या पूर्वी देखील विविध मार्गाने लढा सुरु आहे.सदर प्रकरणाच्या सुनावणीमध्ये शेती महामंडळाच्या वतीने उच्च न्यायालयात १० नोव्हेंबर २०१९ रोजी सदर आकारी पडीक जमिनीचा ताबा इतर कोणालाही देण्यात येणार नाही असे अभिवचन देण्यात आले होते.मात्र त्यानंतर सदर जमिनी या महामंडळाच्या वतीने निविदा काढून देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येऊन यातील काही जमिनी निविदा धारकांच्या ताब्यात देखील देण्यात आल्या होत्या. मात्र या आकारी पडीक शेतकऱ्यांच्या जमिनी देण्याबाबत या शेतकऱ्यांनी वारंवार मागण्या करूनही व त्यासाठी वेळोवेळी आंदोलने करूनही शासन या प्रश्नाबाबत उदासीन दिसून आले आहे.त्यामुळे आकारी पडीक शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीच्या जमिनी मिळविण्यासाठी वर्षानुवर्षे लढा द्यावा लागत आहे.मात्र तरीही त्याला सरकारने दाद दिलेली नाही हा त्या शेतकऱ्यांवर व त्यांच्या वारसांवर राजरोस अन्याय झालेला आहे.मात्र दारोदार भटकूनही त्यांना अद्याप कोणीही न्याय दिलेला नाही.मात्र या प्रश्नांचा वापर करून या शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम अनेकांनी करून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे.म्हणून या प्रश्नावर या शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचा निर्णय नुकताच घेऊन निळवंडे धरणाच्या सात तालुक्यातील लाभक्षेत्रातील १८२ दुष्काळी शेतकऱ्यांना निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने न्याय देण्यात अद्याप पर्यंत प्रमुख भूमिका निभावणारे वकील अजित काळे यांचेकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.या प्रश्नी अड्,अजित काळे यांनी या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.व याबाबत नुकतीच वरील क्रमांकाची जनहित याचिका दाखल केली आहे.

या याचिकेत आकारी पडीत जमिनीचे वारसदार शेतकरी जयदीप गिरीधर आसने,रावसाहेब आनंदा काळे,गोकुळ आण्णासाहेब त्रिभुवन,आदिनाथ निवृत्ती झुरळे,गोविंद विश्वनाथ वाघ,तान्हाजी बाजीराव कासार,विठ्ठल किसनराव बांद्रे,विजय भाऊसाहेब बांद्रे,भागवत फकीरचंद बकाल,दत्तात्रय रामचंद्र बकाल,भूषण अनिल कुलकर्णी,बबन बालकिसन वेताळ,बाळासाहेब वसंत आदिक यांनी ९ गावातील आकारी पडीक शेतकरी आदींनी हि याचिका दाखल करण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे.त्यामुळे सदर याचिकेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारे विधीज्ञ अजित काळे यांनी सहभाग घेतल्याने आकारी पडीक शेतकऱ्यांच्या वारसांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close