आरोग्य
कोपरगावात पुन्हा कोरोनाचा विक्रम,२६ बाधित

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात आज कोरोना रुग्णांचा विक्रम स्थापित झाला असून आज ९७ रॅपिड चाचण्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात २६ रुग्ण बाधित आढळले आहे तर ७१ संशयित रुग्ण निरंक आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यात संजीवनी (कोल्हे ) सहकारी साखर कारखान्यावरील विक्रमी १४ रुग्ण तर कोपरगाव शहरात १० रुग्ण तर कोळपेवाडी व येसगाव येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळून आले असून दहा जणांना त्यांचे उपचारानंतर अहवाल नोरांक आल्याने सोडून देण्यात आले आहे तर संजीवनी कारखान्यावरील एकाचे नुकतेच निधन झाले आहे.आता कोरोना मृत्यूंची संख्या दोन झाली असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०३ हजार २८५ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा १८ लाख ०८ हजार १२८ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ३८ हजार २०१ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ४ लाख ४१ हजार २२८ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू १५ हजार ५७६ वर जाऊन पोहचला आहे.नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ० ५ हजार ५३६ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ७४ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यात शिंगणापूर येथील सारीचा रुग्ण धरून दोन बळी गेले आहे.तर आत्ता पर्यंत तालुक्यात शहरासह या पूर्वीच १३१ रुग्ण बाधित झाले आहेत.अलीकडील काही दिवसात बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.यात जेष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या असली तरी चाळीशीच्या वर असलेल्या नागरिकांनाही या साथीत बळी पडावे लागत आहे.विशेषतः आता हि साथ छोटी खेडीही आपल्या मगर मिठीत घेत असल्याचे मंजूर,पढेगाव,करंजी,सुरेगाव पाठोपाठ आता धारणगाव व आता येसगाव व कोळपेवाडीतही पोहचली असल्याचे स्पष्ट होत आहे.
आज आलेल्या अहवालात कोपरगाव शहरातील बैल बाजार रोड लागत असलेल्या ठिकाणी एक १३ वर्षीय मुलगा,सात वर्षीय मुलगी,संजयनगर येथील ६४ वर्षीय पुरुष,टिळकनगर येथील ४५ वर्षीय व ८० वर्षीय पुरुष,संजीवनी (कोल्हे) कारखाना येथील ५२,५५,४१,४३,४९,५६,४८,५०,६०,५०,६०,५८ वर्षीय बारा महिला,या खेरीज ४५ आणि २३ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.टिळेकर वस्ती ३३ वर्षीय पुरुष व द्वारकानगर येथील ३३ वर्षीय पुरुष,श्रद्धानगर येथील १९ वर्षीय तरुण,इंदिरापथ २३ तरुण,लक्ष्मीनगर येथील ६५ वर्षीय महिला,या शिवाय कोळपेवाडी २१ वर्षीय तरुण,येसगाव येथील ३८ वर्षीय तरुण,आदींचा समावेश आहे.कोरोनाच्या डंखामुळे संजीवनी कारखान्यावरील एका ५८ वर्षीय इसमाचे निधन झाल्याने आता या साथीने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या दोन झाली आहे.त्यामुळे आता नागरिकांना सावध होण्याची व स्वतःच आपली खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.