जाहिरात-9423439946
निवडणूक

नवमतदार नोंदणी कार्यक्रम उत्साहात…!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलामाई काळे महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण मंडळ व तहसिल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवमतदार नोंदणी व युवा संवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे.

प्रशासनाने नवमतदार नोंदणीची मोहीम उघडली आहे.तर मतदार नोंदणी कार्यक्रमाची जूनपासून सुरवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण नोंदणी झाली आहे.आता मतदार नोंदणी अधिकारी (बीएलओ) घरीघरी जाऊन नोंदणी करत आहेत.२१ ऑगस्टपर्यंत हा कार्यक्रम चालेल.त्यानंतर त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया सुरू होईल ती २९ सप्टेंबरपर्यंत असेल.१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित यादी १६ ऑक्टोबरपर्यंत निश्चित केली जाईल.त्यानंतर दावे व हरकती स्वीकारल्या जातील.५ जानेवारीला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

यावेळी नायब तहसिलदार आशिष खोमणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की,”मतदान हा आपला महत्त्वाचा अधिकार आहे.त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक नवमतदार विद्यार्थ्यांनी प्राध्यान्याने करून मतदानाचे कर्तव्य पार पडावे.आपल्या देशाने लोकशाही स्विकारली आणि आपण ही लोकशाही पध्दती अजूनही टिकवून ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ अध्यक्षीय मार्गदर्शन करताना बहुसंख्य विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांच्यासाठी ही कार्यशाळा फलदायी ठरेल असे मत व्यक्त केले.यावेळी कोळपेवाडी येथील तलाठी गोविंद खैरनार उपस्थित होते.कार्यशाळा यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.सिकंदर शेख,प्रा.खरात एस.आर.,प्रा.डॉ.शिंदे एस.ए.आदिसंह प्राध्यापक विद्यार्थी बहुसंख्यने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सागर मोरे,प्रा.डॉ.हरिभाऊ बोरुडे यांनी केले तर प्रा.सिकदर शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close