जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिवपदी प्रा.नागपुरे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

धारणगाव-(प्रतिनिधी)

सातारा येथे खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीत उत्तर विभागीय कार्यालय अहमदनगर येथे कार्यरत असलेले विभागीय अधिकारी संजय नागपुरे यांची माध्यमिक विभागाच्या सहसचिवपदी एक मताने निवड झालेली आहे. संजय नागपुरे यांनी कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आपल्या सेवेची सुरुवात केली होती.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

विभागीय अधिकारी असताना दोन वर्षाच्या कालावधीत प्रा.नागपुरे यांनी एन.एम.एम.एस.स्कॉलरशिप,रयत प्रज्ञाशोध परीक्षा,एन.टी.एस.परीक्षा नवोदय परीक्षा या माध्यमातून उत्तर विभागास संस्थेच्या अव्वलस्थानी मानाचा दर्जा प्राप्त करून दिला होता.त्यांच्या या कार्याची दखल घेत रयत शिक्षण संस्थेने खा.शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पदाधिकार्‍यांच्या निवडीत दि.२७ जून रोजी रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिवपदी त्यांची निवड केली आहे.

प्रा.नागपूर यांनी पुढील काळात श्रीगोंदा या ठिकाणी आपली कारकीर्द दहा वर्षे पूर्ण केली.त्यानंतर शिवशंकर विद्यालय रवंदे या ठिकाणी चार वर्ष सेवा करून सन-२०११ मध्ये श्री छत्रपती शिवाजी विद्यालय या ठिकाणी प्राचार्यपदी विराजमान झाले होते.या शाखेमध्ये त्यांनी आपल्या कामकाजाची छाप पाडून या विद्यालयास कर्मवीर पारितोषिक मिळवून दिले होते.याच काळामध्ये माजी खा.शंकरराव काळे यांचे विश्वासू प्राचार्य म्हणून नाव लौकिक मिळविला.याच काळामध्ये ते रयत शिक्षण संस्थेचे आजीवन सेवक व आजीवन सदस्य झाले होते.त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल येसगाव या ठिकाणी प्राचार्यपदी काम करून त्याही विद्यालयास कर्मवीर पारितोषिक मिळवून दिले.सन-२०१८ मध्ये त्यांच्या कामाची दखल घेऊन रयत शिक्षण संस्थेने त्यांची उत्तर विभागीय अधिकारी म्हणून अहमदनगर येथे निवड केली.या काळामध्ये अंबिका विद्यालय केडगाव येथे प्राचार्य पदाची धुरा सांभाळत या विद्यालयास कर्मवीर पारितोषिक प्राप्त करून दिले.रयत शिक्षण संस्थेमध्ये तीन शाखांना पारितोषिक प्राप्त करून देणारे एकमेव प्राचार्य म्हणून लौकिक स्थापन केला असल्याचे म्हटले जाते.विभागीय अधिकारी असताना दोन वर्षाच्या कालावधीत प्रा.नागपुरे यांनी एन.एम.एम.एस.स्कॉलरशिप,रयत प्रज्ञाशोध परीक्षा,एन.टी.एस.परीक्षा नवोदय परीक्षा या माध्यमातून उत्तर विभागास संस्थेच्या अव्वलस्थानी मानाचा दर्जा प्राप्त करून दिला होता.त्यांच्या या कार्याची दखल घेत रयत शिक्षण संस्थेने खा.शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पदाधिकार्‍यांच्या निवडीत दि.२७ जून रोजी रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिवपदी त्यांची निवड केली आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील,मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने,व्हाईस चेअरमन भगीरथजी शिंदे, सचिव भाऊसाहेब कराळे,विभागीय अध्यक्ष दादाभाऊ कळमकर,शंकरराव कोल्हे,आ.आशुतोष काळे,अरुण कडू,बाबासाहेब भोस,राजेंद्र फाळके,तसेच सर्व रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी,प्राचार्य,मुख्याध्यापक व सर्व रयतसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close