नगर जिल्हा
शिर्डीनजीक दुचाकीस अपघात,शिर्डी कोपरगाव येथील दोन ठार

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील शिर्डी नजीक नगर-मनमाड या राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी चारच्या सुमारास एका दुचाकीला अज्ञात वहानाने दुचाकीस मागील बाजूने दिलेल्या धडकेत कोपरगाव शहरातील तरुण अविनाश चांगदेव भगुरे (वय-२५) व शिर्डी येथील तरुण साईनाथ कचरू भडांगे ( वय-२३) दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.अपघाता नंतर अज्ञात वाहन फरार झाले आहे.या घटनेने कोपरगाव शिर्डी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मयत झालेले दोघेहि तरुण नेमके कोठून कोठे जात होते याची माहीती उपलब्ध झालेली नाही.दरम्यान त्यांच्या ताब्यात होंडा सी.डी. डिलक्स (क्रमांक एम.एच.-१७,६४१५) हि दुचाकी होती.या गाडीवरून राहाता या शहराकडून शिर्डीकडे येत असावे मात्र अज्ञात वाहनाने त्यांना मागील बाजूने धडक दिल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. हा अपघात राहाता-शिर्डी शिवेनाजीक असलेल्या नगर मनमाड रोडवरील के.बी.एस. ग्रँड समोर वर्दळीच्या ठिकाणी घडला आहे.या घटनेने कोपरगाव व शिर्डी परिसरात शोककळा पसरली आहे.