कोपरगाव तालुका
..या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या विजेता तरूण मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याची माहिती या मंडळाचे अध्यक्ष गणेश आढाव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
जगभर कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराने थैमान घातले कोरोना साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.त्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने केंद्र व राज्य सरकार तसेच आरोग्य विभागाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत शनिवार दिनांक २३ मे २०२० रोजी विजेता तरूण मंडळाने संजीवनी ब्लड बँकेच्या सहकार्याने कोपरगाव शहरातील श्री वरद विनायक व दत्तात्रय मंदिर इंदिरापथ तेरा बंगले या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे तसेच सुरक्षित अंतराचे पालन करून हे रक्तदान शिबिर पार पडले.
देशभरात व राज्यात कोरोना विषाणूने कहर केला आहे.राज्यात मोठ्या संख्येने नागरिक या साथीत बळी पडत आहेत.त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.या पार्श्वभूमीवर रक्तदानाचे महत्व वाढत आहे.हि गरज ओळखून कोपरगाव शहरातील श्री वरद विनायक व दत्तात्रय मंदिर इंदिरापथ तेरा बंगले या ठिकाणी असलेल्या विजेता तरूण मंडळाने संजीवनी ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले होते.त्याला सुमारे पन्नास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
यावेळी या रक्तदान शिबिरास संजीवनी सैनिकी स्कूलचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी भेट दिली होती.शिबिरात मंडळातील जवळपास ५० सभासद रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात महिलांचा देखील सहभाग होता.या शिबिराच्या यशाबद्दल तहसीलदार योगेश चंद्रे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी कौतुक केले. शिबीर यशस्वितेसाठी गणेश आढाव बाळासाहेब गवारे,आप्पा नवले वैभव सोनवणे,गणेश शिरोडे,बाबासाहेब आढाव,प्रकाश चव्हाण,पराग संधान,अमित वडांगळे,शंकर देवकर,राजू सुपेकर,यांच्यासह सर्व सदस्य कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.