कोपरगाव तालुका
कोपरगावात सावरकर जयंती उत्साहात साजरी

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील भाजपच्या (वसंत स्मृती)वतीने आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर यांची जयंती कोपरगाव नगर अपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते.भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण,स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी तसेच हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ,विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला विरोध करणारे समाज क्रांतिकारक,भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते,प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक व पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिलेली आहे.
सावरकरांनी ‘१८५७ चा स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ लिहीला त्यात सावरकरांनी मांडले आहे की १८५७ चा उठाव हे बंड नसून हा एक स्वातंत्रसंग्राम होता.त्यांचे स्वातंत्र्याचे कार्य अजोड मानले गेले आहे.तरी त्यांना उपेक्षा वाट्याला आली. त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी आज कोपरगाव नगरपरिषदेत आज त्यांची जयंती साजरी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.त्यानिमित्ताने सावरकर चौक येथील स्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,चेतन खुबाणी,अनिल काले,व तुषार बागरेचा आदी मान्यवर उपस्थित होते.