नगर जिल्हा
..त्या महिला शिक्षकांची जबाबदारी कोण घेणार-विचारणा
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर बाधित किंवा संशयित रुग्णासाठी देखरेखीसाठी अनेक शिक्षकांसह महिला शिक्षकांची नेमणूक राज्य शासनाने केली असून त्यांना आता रात्रपाळीच्या कर्तव्यावर नियुक्त करण्याचा सपाटा चालवला आहे.मात्र काही परीचारिका व डॉक्टरसोबत विक्षिप्तपणा करणाऱ्या रुग्णांची उदाहरणे दूरदर्शनवर देशभर गाजत असताना या महिला शिक्षकांची जबाबदारी नेमकी कोण घेणार आहे ? असा सवाल सदिच्छा मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माळवे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये विचारला आहे.
शासकीय कामासाठी नेहमी पहिला कान पिळला जातो आता कोरोना संशयित रुग्णासाठी देखरेखीसाठी शिक्षकांची शासनाने पहिली नेमणूक केली आहे.आमचा त्या बाबत शासनांशी वाद नाही व वर्तमानात सुट्या असल्याने कर्त्यव्य टाळण्याचा प्रश्न नाही .मात्र देशभरात काही तब्लिगिनी व विक्षिप्त रुग्णांनी डॉक्टर,परिचारिका यांचेशी केलेले गैरवर्तन सगळ्या जगाने दूरदर्शन वाहिन्या,सामाजिक संकेत स्थळावर पाहिले आहे.त्यातच शासनाने या महिला शिक्षकांना रात्रीच्या कर्तव्यावर नेमल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.त्यासाठी त्यांनी नगर तालुक्यातील उक्कडगाव ग्रामपंचायतीचे उदाहरण दिले आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ५८० ने वाढून ती ७१ हजार ३४८ इतकी झाली असून २३१० जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या २३ हजार ४०१ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ८६८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ६३ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून १७ मे पर्यंत केली आहे.आता शासन चौथी टाळेबंदी टप्पा सुरु करण्याचा प्रयत्नात आहे.देशभरात व राज्यात कोरोनाची वाढती संख्या पाहता आता आरोग्य विभागाला जास्त कर्मचाऱ्यांची गरज भासत आहे.
राज्यात प्राथमिक शिक्षकांची संख्या सुमारे सव्वा दोन लाख तर माध्यमिक शिक्षकांची संख्या पावणेदोन लाख आहे.प्राध्यापकांची संख्या काही हजारात आहे.असे असताना या दोन घटकाना प्राथमिक शिक्षकांपेक्षा पगारही जास्त असताना या कामावर पहिल्यांदा प्राथमिक शिक्षकांचाच विचार होतो हि आश्चर्याची बाब आहे-राजेंद्र थोरात,माजी उपाध्यक्ष, शिक्षक सहकारी शिक्षक बँक
त्यासाठी ज्यांचा शासकीय कामासाठी नेहमी पहिला कान पिळला जातो त्या शिक्षकांची शासनाने पहिली नेमणूक केली आहे.आमचा त्या बाबत शासनांशी वाद नाही व वर्तमानात सुट्या असल्याने कर्त्यव्य टाळण्याचा प्रश्न नाही .मात्र देशभरात काही तब्लिगिनी व विक्षिप्त रुग्णांनी डॉक्टर,परिचारिका यांचेशी केलेले गैरवर्तन सगळ्या जगाने दूरदर्शन वाहिन्या,सामाजिक संकेत स्थळावर पाहिले आहे.त्यातच शासनाने या महिला शिक्षकांना रात्रीच्या कर्तव्यावर नेमल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.त्यासाठी त्यांनी नगर तालुक्यातील उक्कडगाव ग्रामपंचायतीचे उदाहरण दिले आहे,त्या ग्रामपंचायतीचा आदेशच आमच्या प्रतिनिधींच्या हातात आला आहे.राज्यात प्राथमिक शिक्षकांची संख्या सुमारे सव्वा दोन लाख तर माध्यमिक शिक्षकांची संख्या पावणेदोन लाख आहे.प्राध्यापकांची संख्या काही हजारात आहे.असे असताना या दोन घटकाना प्राथमिक शिक्षकांपेक्षा पगारही जास्त असताना या कामावर पहिल्यांदा प्राथमिक शिक्षकांचाच विचार होतो हि आश्चर्याची बाब आहे.आमची त्याला हरकत नाही.मात्र रात्रीच्या सुमारास या शिक्षकांची दुर्घटना झाली तर याची जबाबदारी शासनाने प्रथम निश्चित करावी अशी मागणी त्यांनी केली असून या आधीच या शिक्षकांकडून जनगणना,निवडणुका,खिचडी,विविध पाहण्या,नोंदण्या आदींची कामे नित्याचीच आहे.याने फार काही होणार नाही,त्याला आमची हरकत नाही मात्र महिला शिक्षकांचा विचार शासनाने प्रथम करावा अशी मागणीही कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माळवे यांनी शेवटी केली आहे.