जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयात कार्यशाळा उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

   महाराष्ट्र शासनाच्या “वाचन संकल्प महाराष्ट्राचा”अंतर्गत के.जे.सोमय्या महाविद्यालयात विविध उपक्रमांचे दिनांक ०१ ते १५ जानेवारी यादरम्यान आयोजन करण्यात आले होते.त्यात निबंध लेखन,पुस्तक परीक्षण,ग्रंथ प्रदर्शन,’वाचनाचे महत्त्व’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा तसेच या पंधरवड्याची सांगता मोठ्या उत्साहात ‘ग्रंथ दिंडीने’ करण्यात आली आहे.

ग्रंथ दिंडी हा कार्यक्रम साक्षरता वाढवण्यासाठी आणि वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला जातो.या कार्यक्रमात ग्रंथांची मिरवणूक केली जाते.ग्रंथ दिंडीमध्ये लिळाचरित्र, श्रीज्ञानेश्वरी,भारताचे संविधान असे ग्रंथ असतात. 

  

ग्रंथ दिंडीसाठी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे हे उपस्थित होते.सदरचा उपक्रम असून विद्यापीठ स्तरावर हा सोहळा गौरविला जाईल व आपल्या महाविद्यालयातील विविध कलागुणांचा ठसा उमटवला जाईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.व्ही.सी.ठाणगे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

    “वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी अतिशय स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र शासनाने अमलात आणला असून असेच नवनवीन उपक्रम ग्रंथालय विभागातून तसेच अन्य विभागातर्फे आपण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवत राहू” असे आपल्या मनोगतात प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना म्हटले आहे.

    यावेळी ग्रंथदिंडीसाठी सर्व विद्यार्थी व प्राध्यापक पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते.यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी फुगडी खेळून व अभंगाच्या नामघोशात ग्रंथ दिंडीला चांगलाच प्रतिसाद लाभला होता.ग्रंथदिंडीसाठी महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे निबंधक डॉ.अभिजीत नाईकवाडे हेही उपस्थित होते.


   ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ.निता शिंदे यांनी ग्रंथदिंडीच्या सांगता वेळी सर्वांचे आभार मानले व यापुढेही विद्यार्थ्यांसाठी आपण अनेक उपक्रम राबवत राहु असे आश्र्वासित केले आहे. ग्रंथदिंडीच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय विभागातील विकास सोनवणे,गणेश पाचोरे,स्वप्निल आंबरे,रवींद्र रोहमारे,अजय पिठे,परसराम लांडगे,हजारे महेश,माळी दिनकर, कुलकर्णी नितीन आदींनी परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close