नगर जिल्हा
..हा तालुका झाला कोरोना विषाणू मुक्त !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहात्यामध्ये आढळलेल्या एकमेव रुग्णाचे दोन्ही अहवाल नकारात्मक आले असून त्यामुळे राहाता तालुका कोरोनामुक्त झाला असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी आमच्या प्रतिणीधीस दिली आहे. कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. तालुका कोरोना रुग्णमुक्त झाला असला तरी तालुक्यातील लॉकडाऊन स्थिती पुर्वीप्रमाणेच ३मे पर्यंत कायम राहणार असून जनतेने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात सहकार्य केले तसेच पुढील कालावधीतही सहकार्य करावे असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.
कोरोनबाधीत रुग्णावर अहमदनगर येथील येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु होते. चौदा दिवसाच्या कालावधीनंतर या रुग्णाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या व्यक्तिच्या संपर्कात आल्यामुळे राहाता तालुक्यातील कोल्हार, भगवतीपूर, लेाणी बुद्रुक, लोणी खुर्द, दाढ बुद्रुक, पाथरे, हणमंतपूर व हसनापूर या परिसरातील ५५ व्यक्तींना निघोज ता.राहाता येथील श्री साईबाबा संस्थानच्या साई आश्रम फेज-२ धर्मशाळा, हेलीपॅड रोड येथील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार पूर्ण होऊन कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून न आल्यामुळे त्यांना विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.
राहाता तालुका कोरोनामुक्त झाला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करावे. नागरीकांनी खबरदारी घेतानाच जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, ते नागरिकांच्या हितासाठीच आहेत, त्यामुळे सर्वांनी त्याचे पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.