जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

तालुक्याचे कृषी उत्पादन वाढविण्याची गरज-आ. काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना विषाणूच्या साथीने कृषी क्षेत्र अडचणीत आले असून शेतकरी या संकटामुळे कोलमडून पडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव तालुक्यात पाच मंडलामध्ये पाच स्वयंचलीत हवामान केंद्रे आहे. हि संख्या कमी असल्यामुळे पिक विम्याचे निकष लावतांना अडचणी निर्माण होवून अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहिले असून त्यासाठी कोपरगाव तालुक्यात स्वयंचलीत हवामान केंद्रांची संख्या वाढवावी- आ. आशुतोष काळे

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे,कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले, जि. प.सदस्य सुधाकर दंडवते, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, विस्तार अधिकारी सुनील माळी, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, मंडल कृषी अधिकारी मनोज सोनवणे, पंचायत समिती कृषी अधिकारी पंडित वाघिरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) प्रकाश आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताची व बी-बियाणांची कमतरता पडणार नाही याची काळजी घ्यावी. पिकांवर पडणारे विविध रोगांचा पार्दुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. शेततळे व कांदा चाळीचा लाभ हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी शेती शाळेचे आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ अनेक अपघाती निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मिळावा यासाठी प्रचार प्रसिद्धी करावी. मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांना खरीप पिक विमा संदर्भात योग्य ती माहिती मिळत नसल्यामुळे शेतकरी खरीप पिक विम्यापासून वंचित राहत आहे त्यासाठी पिक विमा संदर्भात कृषी विभागाने प्रचार प्रसिद्धी करावी. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून पेरू, डाळींब, चिक्कू आदी फळांची कलमे वेळेत उपलब्ध करून दयावी. कोरोनाच्या संकटात टाळेबंदी करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची द्राक्ष, चिक्कू आदी नाशवंत फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या फळांच्या उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करावे. जलसंधारण च्या कामासाठी नाला खोलीकरण व गाळ काढण्याच्या कामांसाठी शासनाकडून निधी मिळावा यासाठी यासाठी प्रस्ताव सादर करावे. शेती उपयोगी अवजारे व ट्रॅक्टर मिळणेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांच्या प्रमाणात लक्षांक वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न करावा. शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त अनुदानित बियाणे उपलब्ध करून द्यावी. मागेल त्याला शेततळे व कांदाचाळी ऑनलाईन प्रणाली सुरु करावी. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गतवर्षीचे ठिबक अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे यासाठी प्रयत्न करून चालू वर्षी ऑनलाईन अर्ज स्वीकृती सुरु करावी.कार्यक्रमाचे प्रास्तविक तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी केले तर सूत्रसंचलन मंडल अधिकारी मनोज सोनवणे,तर उपस्थितांचे आभार कृषी अधिकारी पंडित वाघेरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close