जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात ..या नगरसेवकांकडून किराणा वाटप

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील अडचणीत आलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष संजय सातभाई,नगरसेविका ऐश्वर्या सातभाई,उपाध्यक्ष योगेश बागुल यांच्या वतीने प्रभाग क्रमांक मध्ये नागरिकांना किराणा वस्तूं संचाचे वाटप कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे.

कोरोना साथीने सर्वसाधारण नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.प्रशासन व पोलीस नागरिकांना घराच्या बाहेर येऊ देत नाही.हाताला काम नाही.दैनंदिन खर्च थांबण्याचे नाव घेत नाही.पोटाची भूकही टाहो फोडत आहे. त्यामुळे नागरिक आर्थिक विवंचनेत सापडले आहे.आर्थिक दुर्बल घटक त्यात भरडून निघाला आहे.याची जाणीव ठेऊन कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे कार्यकर्ते संजय सातभाई,नगरसेविका ऐश्वर्या सातभाई,उपाध्यक्ष योगेश बागुल यांनी या बाबत कणव दाखवून नागरिकांना अल्पशी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ४०२ ने वाढून ती २० हजार ४८२ इतकी झाली असून ६५३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ५ हजार २१८ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २५१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या २९ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या कोरोना साथीने सर्वसाधारण नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.प्रशासन व पोलीस नागरिकांना घराच्या बाहेर येऊ देत नाही.हाताला काम नाही.दैनंदिन खर्च थांबण्याचे नाव घेत नाही.पोटाची भूकही टाहो फोडत आहे. त्यामुळे नागरिक आर्थिक विवंचनेत सापडले आहे.आर्थिक दुर्बल घटक त्यात भरडून निघाला आहे.याची जाणीव ठेऊन कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे कार्यकर्ते संजय सातभाई,नगरसेविका ऐश्वर्या सातभाई,उपाध्यक्ष योगेश बागुल यांनी या बाबत कणव दाखवून नागरिकांना अल्पशी मदत करण्याचा निर्णय घेतला त्यात ३ कि.ग्रॅ.गहू,२ कि. ग्रॅ.तांदूळ,१ कि. ग्रॅ.साखर,अर्धा लिटर गोडेतेल,१०० ग्रॅम चहा पावडर आदी वस्तूंचा संच सुमारे सहाशे कुटुंबांना देण्यात आला आहे.त्यावेळी विक्रमादित्य सातभाई,पप्पू पडियार आदी मान्यवर उपस्थित होते.या पदाधिकाऱ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close