जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दुचाकी चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील तालुक्यातील कोकमठाण माळवाडी येथील रहिवासी असलेले रहिवासी प्रवीण सुभाष पोटे यांची होंडा ऍक्टिव्हा हि दुचाकी (क्रं.एम.एच.१७ बी.टी.१२८७) हि नुकतीच अज्ञातच चोरट्याने लंपास केली आहे.त्यामुळे दुचाकीस्वारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वर्तमानात कोपरगाव शहर आणि परिसरात दुचाकी चोरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्यामुळे दुचाकीस्वार धास्तावले आहे.त्यात वर्तमानात दिवाळी गर्दीचा हंगाम असल्याने चोरट्यांना ऐन गर्दी काळात संधी प्राप्त होत आहे.अशीच घटना नूकतीच कोपरगाव शहरानजीक असलेल्या पुणतांबा चौकात असलेल्या ‘हॉटेल आनंद’ समोर घडली आहे.

त्या ठिकाणी फिर्यादी हे आपली दुचाकी उभी करून जेवणासाठी हॉटेल मध्ये गेले असता अज्ञातच चोरट्याने त्यांच्यावर पाळत ठेवून ते हॉटेल मध्ये गेल्याचे पाहून त्यांची दुचाकी लंपास केली आहे.ते आपले जेवण आटोपल्यावर बाहेर आले असता त्या ठिकाणी त्यांना वरील क्रमांकाची आपली दुचाकी आढळली नाही.त्यावेळी त्यांनी नजीकच्या ठिकाणी शोधाशोध करून पाहिली असता त्यांना यश आले नाही.अखेर त्यांना आपली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची खात्री झाली त्या नंतर त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असल्याची माहिती सदर फिर्यादीने दिली आहे.

या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलिसांत या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे.मात्र अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही अशी माहिती फिर्यादी यांनी दिली आहे.आधी पुढील तपास शहर आणि परिसरात करून मगच तक्रार दाखल करावी असा सल्ला दुचाकी मालकास शहर पोलिसांनी त्यांना दिला असल्याचे समजत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close