जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

…या तालुक्यातील गुलामगिरी संपविण्यासाठी आपली लढाई-थोरात 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी मतदार संघातील जनतेला गुलामगिरीत ढकलणाऱ्यांच्या विरोधात आपली लढाई असून पैसा आणि दहशतीचा वापर करून येथील जनतेला वर्षानुवर्ष गुलामीत टाकणाऱ्यांना जनतेची ताकद दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच शिर्डी येथे बोलताना केले आहे.

सदर प्रसंगी शिर्डी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी सचिन चौगुले यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या निवडीची घोषणा यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केली.आ.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन चौगुले त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

माजी महसूलमंञी आ.बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सचिन चौगुले यांची शिर्डी शहराच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. त्या निमित्त त्याचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे,महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते,युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे,विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर,अविनाश दंडवते,जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे,तालुका अध्यक्ष पंकज लोंढे,नगरसेवक सुरेश आरणे,उत्तमराव मते,सदाशिव वर्पे,रमेश गागरे,सदाशिव गाडेकर,अविनाश शेजवळ,पगारे मामा,संजय डांगे,अमोल बनसोडे,मुन्ना फिटर,राज महम्मद शेख,संतोष गायकवाड,संजय जेजुरकर,निलेश डांगे,मच्छिंद्र गुंजाळ,योहान गायकवाड,ज्ञानेश्वर हतांगळे,संतोष वाघमारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आपण शिर्डीत,राहात्यात येतो ते चांगले करण्यासाठी.जनतेच्या मनात येथे बदल घडावा अशी सुप्त इच्छा आहे.राहाता बाजार समितीची निवडणूक असो किंवा गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जनतेने आपली भावना मुक्तपणे बोलून दाखवली आहे.शिर्डीत सुद्धा धन सत्तेच्या विरोधातील ही लढाई लढताना जनता आपल्या सोबत आहे.हत्ती कितीही मोठा असला तरीही मुंगी त्याला नाचवू शकते,पराभूत करू शकते हे कोणीही विसरू नये.यंत्रणांचा गैरवापर करून गुन्हे दाखल करणे,धमक्या देणे, अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली वर्षानुवर्ष धाक दाखवून शिर्डीतील व या तालुक्यातील जनतेला गुलाम बनविण्याचे काम येथील नेतृत्वाने वारंवार केले आहे,आपल्याला ती गुलामगिरी संपवायची असून ती वेळ आता आली असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

सदर प्रसंगी शिर्डी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी सचिन चौगुले यांच्या निवडीची घोषणा यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केली.आ.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन चौगुले त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

सदर प्रसंगी प्रास्तविक डॉ.एकनाथ गोंदकर यांनी केले आहे.तर सूत्रसंचालन अविनाश दंडवते यांनी  केले आहे तर उपस्थितांचे आभार तालुका अध्यक्ष पंकज लोंढे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close