गुन्हे विषयक
घराच्या कारणारून मारहाण,तीन गंभीर जखमी,कोपरगावात गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील टाकळी नाका येथील रहिवासी असलेला फिर्यादी विकास मनोहर विघे व त्यांच्या नातेवाईकांत घर वाटपाच्या कारणावरून वाद असून यातून नुकतीच दोन गटात मारहाण झाली असून यात फिर्यादी विकास विघे,अनिकेत विकास विघे,भामाबाई मनोहर विघे आदी तीन जण गंभीर जखमी झाले आहे.यातील आरोपी अतुल विघे,प्रफुल्ल विघे,विशाल विघे,संगीता विघे,अलका विघे,आदी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी विकास विघे व त्याचे नातेवाईक अतुल गोरख विघे यांच्यात वडिलोपार्जित घराच्या कारणावरून वाद आहेत.ते काही दिवसापूर्वी काही जेष्ठ नागरिकांनी मध्यस्ती करून मिटवले होते.मात्र सदर वाद सोमवार दि.०८ मे रोजी मोठ्या प्रमाणावर पुन्हा उफाळून आले होते.त्यातून हा प्रताप घडला आहे.त्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहे.
दरम्यान या घटनेत सहभागी असलेले आरोपी अतुल गोरख विघे,प्रफुल्ल गोरख विघे,विशाल गोरख विघे,संगीता राजेंद्र विघे,अलका गोरख विघे,सर्व रा.टाकळी नाका आदींनी रात्री ०९.३० वाजेच्या सुमारास आपले सर्व नातेवाईक जमा करून वडीलोपार्जींत घराचे कारणावरून वाद घालत फिर्यादी विकास विघे व त्याचा मुलगा अनिकेत विघे,आई भामा बाई विघे आदींना लाकडी दांड्याच्या साहाय्याने त्यांना फिर्यादीच्या घरासमोर गंभीर मारहाण केली आहे.त्यात ते तिघे जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ कोपरंगाव नजीक असलेल्या श्री संत जनार्दन स्वामी रुग्णालयात भरती केले आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी भेट दिली आहे.कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.२१९/२०२३ भा.द.वि.कलम ३२६,३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९,अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.