सामाजिक उपक्रम
प्रहारच्या प्रयत्नातून…या भागातील कामगारांना माध्यान्न भोजन…
न्यूजसेवा
देवळाली प्रवरा-(प्रतिनिधी)
प्रहार श्रमिक सेवा संघाच्या प्रयत्नांतून देवळाली प्रवरा हद्दीतील असलेल्या प्रसादनगर भागात आज पासून मध्यांन भोजन सुरु करण्यात आले असल्याची माहिती प्रहार श्रमिक सेवा संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
“देवळाली प्रवरा शहरामध्ये प्रहाचे माध्यमातून पाच ठिकाणीं कामगार मंडलाचे वतीने देण्यात येणारे मध्याणं भोजन व्यवस्था केली असून प्रसादनगर भागातील जवळपास पस्तीस कामगारांना या मध्याण भोजनाचा लाभ मिळणार आहे.येथील जास्तीत जास्त कामगारांनी प्रहार श्रमिक सेवा संघाकडे आपली नोंद करुण मध्यानं भोजनासह विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा”-आप्पासाहेब ढुस,अध्यक्ष,प्रहार श्रमिक सेवा संघ.
प्रहार श्रमिक सेवा संघाच्या प्रयत्नांतून व महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंत्रालयाच्या वतीने राज्यातील असंघटीत कामगारांना देण्यात येणारे मध्यान भोजन कार्यक्रमाचे उदघाटन प्रसादनगर भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तैनुर पठाण यांचे हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.
प्रसंगी प्रहार श्रमिक सेवा संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस,सचिव बाळासाहेब कराळे,देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष नवनाथ चव्हाण,प्रहार जनशक्ती पक्षाच्या राहुरी फॅक्टरी महीला शहराध्यक्ष रजनी कांबळे,उपाध्यक्ष वंदना कांबळे, राहुरी फॅक्टरी शहर उपाध्यक्ष एकनाथ वाणी,गणेश भालके,संघटक प्रभाकर कांबळे व बहुसंख्य असंघटित कामगार उपस्थीत होते.
प्रसंगी बोलताना आप्पासाहेब ढूस म्हणाले की,”देवळाली प्रवरा शहरामध्ये प्रहाचे माध्यमातून पाच ठिकाणीं कामगार मंडलाचे वतीने देण्यात येणारे मध्याणं भोजन व्यवस्था केली असून प्रसादनगर भागातील जवळपास पस्तीस कामगारांना या मध्याण भोजनाचा लाभ मिळणार आहे.येथील जास्तीत जास्त कामगारांनी प्रहार श्रमिक सेवा संघाकडे आपली नोंद करुण मध्यानं भोजनासह विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करुण देवळाली प्रवरा हद्दीतील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी प्रहार प्रयत्नशीलअसुन कामगार मंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कडून नागरिकांना तात्काळ सेवा मिळत असल्याबद्दल ढूस यांनी आभार व्यक्त केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तैनुर भाई पठाण यांनी केले आहे.यात त्यांनी प्रसादनगर भागात प्रहारच्या वतीने देण्यात येत असललेल्या सुविधा बाबत समाधान व्यक्त केले आहे.सूत्रसंचालन नवनाथ चव्हाण यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार ‘प्रहार’च्या महीला शहराध्यक्ष रजनी कांबळे यांनी मानले आहे.