जाहिरात-9423439946
आरोग्य

रेल्वे प्रवासात अडलेल्या महिलेची सुखरूप सुटका,कोपरगावातील घटना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

प्रत्येक स्त्री साठी आई होणं हे एक स्वप्न असतं.आई होण्यासारखं दुसरं सुख नाही असं प्रत्येकीला वाटत असतं मात्र हि वेळ एखाद्या महिलेला जर प्रवासात आली तर ! या कल्पनेने कोणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.मात्र अशीच दुर्दैवी घटना रेल्वे प्रवासात घडली असून उत्तर प्रदेशातील झांशी येथील महिलेला प्रवासातून ऐन वेळी कोपरगाव रेल्वे स्थानकावर उतरून घ्यावे लागले होते मात्र त्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी हे देवदूत ठरल्याने सदर महिलेची प्रसूती करून तिची सुटका केली आहे.त्यामुळे या वैद्यकीय पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर घटनेतील उत्तर प्रदेश येथील आपदग्रस्त महिला महिला रिटा देवी आणि दिपक कुशवाल हे जोडपे आणि त्यांचे कुटुंबासमवेत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन यादव दिसत आहेत.त्यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

बाळंतिणीचे आरोग्य अखेरच्या काळात खूपच महत्त्वाचे असते.डिलिव्हरी झाल्यानंतर काही महिलांना अनेक त्रासालाही सामोरे जावे लागते.पण त्यापैकी काही त्रास हे बाळंतिणीच्या आरोग्यासाठी धोक्याची लक्षणे ठरतात.त्यामुळे पण आजकाल आई होणं वाटतं तितकं नक्कीच सोपं राहिलेले नाही.मुळातच हल्ली लग्न उशीरा होतात आणि त्यानंतर बाळासाठी प्रयत्नही उशीराच केले जातात.त्यामुळे हल्ली फारच कमी वेळा महिलेची बाळांतपणातून साधारण सुटका (नॉर्मल डिलिव्हरी) झाल्याचं ऐकायला येतं.सिझर झाल्यानंतर तर गरोदरपणामध्ये अधिक काळजी घ्यावी लागते.गरोदरपणामध्ये नक्की काय काळजी घ्यावी लागते ? याचीही अनेक कारणं आहेत.वास्तविक गरोदरपणानंतर सर्वात जास्त बाळाबरोबर स्वतःचीही काळजी घ्यावी लागत असते.मात्र हे भाग्य प्रत्येकीच्याच वाटेला येते असे नाही.उत्तर प्रदेश,बिहार,राजस्थान,झारखंड आदी प्रदेशातील पुरुष आणि महिला यांना विशिष्ट हंगामात आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या घरापासून देशाच्या दुसऱ्या भागात घरापासून शेकडो कि.मी.दूर तात्पुरते राहावे लागते राहून त्यातून त्यांचा प्रवास ठरलेला असतो.त्यात अशा दिवस गेलेल्या महिला सोबत असतील तर फारच बिकट प्रसंग ओढवू शकतो अशीच घटना नुकतीच एका उत्तर प्रदेश येथील जोडप्याच्या बाबतीत घडली आहे.

शहरातील खाजगी डॉक्टरांनी सदर महिलेची अवघडलेली स्थिती ओळखून कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात संदर्भीत केले होते.सदर ठिकाणी दुपारी ३.३०च्या सुमारास तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन यादव व डॉ.कृष्णा फौलसुंदर,सिस्टर कल्पना धाकराव हे कर्तव्यावर असताना त्यांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने निर्णय घेऊन सदर महिलेला भरती करून घेतले होते व शहरातील स्रिरोग तज्ज्ञ डॉ.योगेश लाडे,भुलतज्ञ डॉ.कर्डीले यांना तातडीने बोलावून घेऊन रिटा देवी हिची सुटका केली आहे.

सौ.रिटा देवी आणि दिपक कुशवाल हे जोडपे विशिष्ट हंगामात आपला पाणीपुरीचा व्यवसाय कर्नाटक राज्यातील शहापूर या ठिकाणी करते.या महिलेची दोन बाळंतपणे हि कृत्रिम पद्धतीने म्हणजेच सिझेरियन पद्धतीने झालेली आहे.त्यात पहिले बाळ हे देवाला प्रिय झाले होते.अशातच तिसऱ्या बाबत त्यांना दिवस गेले जाऊन ते भरले होते.त्यामुळे त्यांना आपण कधी एकदा आपल्या मूळ उत्तर प्रदेश येथील झांशी येथे सुखरूप घरी जाऊ असे वाटत असताना त्यांनी रेल्वे बुक करून सदर रेल्वेने ते जोडपे नुकतेच जात असताना सदर महिलेला दि.२१ एप्रिल रोजी सकाळी ०४ वाजेच्या सुमारास कर्नाटक शहापूर येथून निघाले होते.व ते दुपारी ०३ वाजेच्या सुमारास अचानक रेल्वे प्रवासात आल्यावर कोपरगाव नजीक कळा सुरु झाल्या होत्या.वेदना तीव्र सुरु झाल्याने त्यांना कोपरगाव येथे रेल्वेस स्थानकावर उतरल्याशिवाय पर्याय राहिला नाही.त्यांनी कोपरगाव रेल्वे स्थानकावर उतरून सदर बाब रिक्षा चालकास सांगून त्यास नजीकच्या दवाखाण्यात सोडण्यास सांगितले होते.या ठिकाणची त्या जोडप्यास कोणतीही माहिती नव्हती.त्याने त्या जोडप्यास कोपरगाव शहरातील खाजगी रुग्णालयात सोडले मात्र त्या ठिकाणी जन्मास येणारे अपत्य हे ‘पायाळू’ असल्याने सदर महिलेची सुटका करण्यात तेथील डॉक्टरांनी सावधानता दाखवत असमर्थता दर्शवली होती.त्यामुळे आता सरकारी रुग्णालयाशिवाय त्यांना पर्याय राहिला नाही.

त्या ठिकाणी असललेल्या खाजगी डॉक्टरांनी सदर जोडप्यास कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात संदर्भीत केले होते.सदर ठिकाणी दुपारी ३.३०च्या सुमारास तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन यादव व डॉ.कृष्णा फौलसुंदर,सिस्टर कल्पना धाकराव हे कर्तव्यावर असताना त्यांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने निर्णय घेऊन सदर महिलेला भरती करून घेतले होते व शहरातील स्रिरोग तज्ज्ञ डॉ.योगेश लाडे,भुलतज्ञ डॉ.कर्डीले यांना तातडीने बोलावून घेतले होते.मात्र त्यांना तिसऱ्या वेळीही महिलेची अवघडलेली स्थिती ओळखून त्यांना सदर महिलेचा सिझेरियन करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.मात्र त्यांनी तो काळजी पूर्वक पार पाडला असून बाळ आणि बाळाची आई दोघांनाही सुखरूप सोडवणूक केली आहे.सदर महिला आता कोपरगाव रुग्णालयात पुढील उपचार घेत आहे.सदर जोडप्याने डॉ.यादव व फौलसुंदर यांचे आभार मानले आहे.या घटनेने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close