निवड
पढेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी…यांची निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पुर्व भागात राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पढेगाव ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी अगोदरच काळे गटाच्या मिनाताई बाबासाहेब शिंदे चांगल्या मताधिक्याने निवडून आल्या असताना आज उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून यात कोल्हे-परजणे युतीचे लक्ष्मण शिंदे यांची वर्णी लागली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पढेगाव ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्यांत सरपंच मीना शिंदे तर उपसरपंच लक्ष्मण विश्वनाथ शिंदे,सदस्यपदी सुवर्णा महेश म्हस्के,उषा संपत तरटे,मुक्ता नामदेव बर्डे,दत्तु वसंत मापारी,संगिता नानासाहेब मापारी,मनिषा अविनाश साळवे,बाबासाहेब दामू आहेर,केशव गंगाधर शिंदे,प्रियंका मोहन कर्पे,बाबासाहेब भगिरथ शिंदे आदींचा समावेश आहे.नूतन पदाधिकऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोल्हे यांच्या गटाची यापुर्वी बहुसंख्येने एकहाती सत्ता असलेल्या पढेगाव ग्रामपंचायतमध्ये यावेळीही सरपंचपद काळे गटाकडे गेले असुन.अकरा सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत एकुण चार प्रभागातून पुढीलप्रमाणे सदस्य निवडून आलेले असुन त्यात तिन सदस्य काळे गटाचे तर उर्वरीत आठ सदस्य कोल्हे-परजणे युतीचे आहेत.उपसरपंच लक्ष्मण विश्वनाथ शिंदे,सदस्यपदी सुवर्णा महेश म्हस्के,उषा संपत तरटे,मुक्ता नामदेव बर्डे,दत्तु वसंत मापारी,संगिता नानासाहेब मापारी,मनिषा अविनाश साळवे,बाबासाहेब दामू आहेर,केशव गंगाधर शिंदे,प्रियंका मोहन कर्पे,बाबासाहेब भगिरथ शिंदे आदींचा समावेश आहे.
उपसरपंच पदाच्या लढतीसाठी काळे गटाचे राजकीय बलाबल कमी असल्यामुळे फारशी राजकीय ढवळाढवळ झाली नाही.नवनिर्वाचित सरपंचाच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय अधिकारी शिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी काम पहिले असून त्यांना ग्रामसेवक बाबासाहेब गुंड,कामगार तलाठी श्री जावळे,ग्रामपंचायत कर्मचारी शरद लाड,नारायण शिंदे आदींनी सहकार्य केले आहे.
सदर निवड प्रक्रिया शांततेत पार पाडली.निवड प्रक्रियेनंतर उत्तम चरमळ यांनी प्रास्तविक करुन ग्रामसेवक बाबासाहेब गुंड यांनी उपस्थितांचे आभार मानले आहेत.