जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
खेळजगत

तलवारबाजी स्पर्धेत…या महाविद्यालयाच्या खेळाडूंचा विजय

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी

कोपरगाव शहरातील श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयात दि.१० डिसेंबर रोजी १४,१७, व १९ वर्षाखालील मुले व मुली यांच्या जिल्हास्तरीय शालेय आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यात के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी तेजस मधुकर कोते यांने १९ वर्षाखालील मुलांच्या गटात व पलक योगेश गंगवाल या विद्यार्थ्यांनी मुलींच्या गटात तलवारबाजी स्पर्धेतील ईपी या प्रकारात विजय मिळवला आहे.त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दोन्ही विजयी खेळाडूंची अ.नगर येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदिप रोहमारे,प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे आदीनी अभिनंदन केले आहे.विजयी खेळाडूंना महाविद्यालयाचे शा.शि.संचालक डॉ.सुनिल कुटे व क्रीडा शिक्षक मिलिदं कांबळे आदींचे मार्गदर्शन लाभले होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close