सामाजिक उपक्रम
समता सैनिक दला’चे प्रशिक्षण शिबिर…या ठिकाणी उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतीय बौद्ध महासभा व कोपरे फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने कोपरगाव शहरात प्रथमच ‘समता सैनिक दला’चे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
कोपरगाव येथील लुम्बिनी बुद्ध विहार येथे संपन्न झालेल्या या शिबिरात तरुणांनी चाळीसहुन अधिक संख्येने आपला सहभाग नोंदवला असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विश्वास जमधडे व कोपरे फाउंडेशनचे अध्यक्ष रामदास कोपरे यांनी दिली आहे.
सदर कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे विभागीय सचिव आनिकराव गांगुर्डे व वरिष्ठ केंद्रीय शिक्षक एम.जी.शिंगाडे गुरुजी व केंद्रीय शिक्षिका मायादेवी खरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सदरचे शिबिराचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सुगंधाराव इंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.
सदर समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिरास अहमदनगर बटालियन कमांडर दादा कर्डक व हिरामण अहिरे यांनी मार्गदर्शन केले आहे.