तंत्रज्ञान
साईबाबा महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धा
संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,व विज्ञान विभाग यांचे वतीने राष्ट्रीय विज्ञाना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त विज्ञान उपकरण स्पर्धा ,भित्तीचित्र स्पर्धा व पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या आहेत.सदर प्रसंगी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे,प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य विकास शिवगजे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्राचार्य शिवगजे म्हणाले की, २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी विज्ञानातील रमण परिणामाचा शोध लावला. या दिवसाचे औचित्य साधून भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विज्ञानाने प्रगत केलेली साधने वापरतो,पण वैज्ञानिक दृष्टिकोनचा वापर करत नाही. वैज्ञानिक दृष्टीकोन’ याचा एका शब्दामध्ये अर्थ – कार्यकारणभाव तपासणे. प्रत्येक कार्याच्या मागे कारण असते. समाजात कधीच चमत्कार घडत नसतात तर ते कोणीतरी घडवून आणत असते.त्यामध्ये एक तर हात चलाखी असते किंवा त्यामागे विज्ञान असते. भारतीय संविधामुळे प्राप्त झालेल्या व मानवाला अभिप्रेत असणाऱ्या कलम ५१ नुसार विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. भारतीय संविधानात नमूद केलेल्या भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व अंगीकार केला पाहिजे.” “कुठल्याही घटितामागचा कार्यकारणभाव समजून घेणे किंवा दोन घटनांमधील परस्परसंबंध तपासून पाहणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. एखादी गोष्ट सत्य आहे की नाही, यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन “निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग.” या मार्गांनी ज्ञान आत्मसात करण्याची विज्ञानाची ही पध्दत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन शब्दप्रामाण्य नाकारतो. एका मोठ्या व्यक्तीने सांगितले म्हणून खरे मानायचे, हे नाकारतो. कोणत्या एका पुस्तकात लिहिलेय म्हणून ते चिकित्सा न करता स्विकारणे हे नाकारतो.वैज्ञानिक दृष्टिकोन नेहमीच नम्र असतो. म्हणजे कोणत्याही घटनेमागे कारण हे असतेच. हा स्विकार म्हणजेच वैज्ञानिक दृ़ष्टिकोन होय.
प्रा.वैशाली देशमुख यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत विज्ञान समजून सांगितले. डॉ.गणेश भांड व प्रा.सुनील पठारे यांनी रमन परिणाम समजून दिला. या कार्यक्रमास अधिक्षक राजेंद्र कोते, मुख्याध्यापक गंगाधर वरघुडे,प्रा.मंदाकिनी सावंत,प्रा.वैशाली देशमुख,प्रा शितल धरम, प्रा स्वप्नाली खांडरे,प्रा.नितीन पावसे,प्रा. सुनिल कवडे,प्रा.दिपक पटारे, प्रा.अमोल कचरे, डॉ.गणेश भांड, डॉ.योगिता कोपटे, प्रा.नानासाहेब गुंजाळ,प्रा.सुनील गायकवाड,प्रा.सुनिल पठारे, प्रा.नानासाहेब सदाफळ,प्रा गणेश मगर, प्रा प्रशांत हासे,प्रा.विकास भांड,दिनेश कानडे,ग्रंथपाल भाऊसाहेब शिंदे,मनोज बकरे, प्रशांत शेळके,रामनाथ कासार आणि महाविद्यालयीन कर्मचारी-विद्यार्थी उपस्थित होते.प्रा.अनिता पवार, प्रा.उषा गायके, प्रा.संगीता बनसोडे,प्रा.दत्तात्रय शेळके,प्रा.सुभाष दंडवते,प्रा.संतोष चौधरी,प्रा प्रमोद चौधरी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.प्रा.प्रदीप शेलार यांनी प्रास्ताविक केले. प्रा.नानासाहेब गुंजाळ यांनी सूत्रसंचलन केले. प्रा.दीपक पटारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.