जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

स्वतःच्या खिशाला चाट लावून कोरोना योध्यास मदत !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

बेलापूर-(प्रतिनिधी)

श्रीरामपुरातील एका रुग्णालयातील काही कर्मचारी कोरोना बाधीत निघाले.कोरोना योद्धे सक्षम रहावेत म्हणून प्रशासनाने व आरोग्य विभागाने उपचारासाठी कार्यवाही केली.एका महीला कर्मचार्‍याची प्रकृती थोडी चिंताजनक वाटल्याने डॉक्टरांनी एका इंजेक्शनची गरज भासू शकते असे सांगीतले.मात्र दवाखान्यात हे इंजेक्शन उपलब्ध नव्हते.बाहेरुन आणण्याचा निर्णय झाला.परंतू तेही मिळेना शेवटी प्रांताधिकारी व तहसीलदारांनी प्रयत्न केले.अखेर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी स्वतः ३२ हजार ४०० रुपये दिले अन् इंजेक्शन उपलब्ध करुन देऊन माणुसकी जपली असल्याने त्यांच्या या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोरोना साथीच्या काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येक कोरोना योद्धयाची नितांत गरज आहे.या भावनेतून प्रांताधिकारी पवार व तहसीलदार पाटील यांनी महसुलचे कर्मचारी पाठवून बाधित महिला कोरोना योध्यासाठी ते उपलब्ध केले.एवढेच नाही तर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी स्वतः त्याची किमंत ३२ हजार ४०० रुपये स्वतः चुकते केले.अन आरोग्य सेवेत काम करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी हे माझे कुटुंब असल्याची अनुभूती दिली आहे.त्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोरोना साथीचे सर्वत्र थैमान सुरु आहे.आज वाढत चालली रुग्ण संख्या चिंताजनक झाली असून रुग्णाला उपचार मिळणे दुरापास्त होत चालले आहे.त्यामुळे जेथे स्वतःचा जीव वाचविण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत दिसत असताना शनिवारी दि.१९ सप्टेंबर रोजी श्रीरामपुरातील रुग्णालयात कर्तव्य करणार्‍या काही कर्मचार्‍यांना मात्र वेगळाच व विस्मयचकित करणारा अनुभव आला आहे.त्याचे झाले असे की,कोरोनाचा उपचार करणाऱ्या एक कोरोना योध्या महिलेस अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची ग्रामिण रुग्णालयामार्फत अँटीजन रॅपीड टेस्ट करण्यात आली.त्यातील काही कर्मचारी कोरोना बाधीत निघाल्याने कोरोना योद्धयांची चिंता वाढली आहे.कोरोनाशी दोन हात करण्यासाठी या योद्धयांचे योगदान महत्वाचे ठरत असल्याने त्यांना तातडीने उपचार मिळण्याकामी प्रांताधिकारी अनिल पवार,तहसीलदार प्रशशंत पाटील,डॉ.वसंत जमधडे यांनी तात्काळ सुविधा उपलब्ध करुन दिल्या.त्यांचेवर कोरोना उपचार केंद्रात उपचार सुरु करण्यात आले.मात्र त्यापैकी एका महीला कर्मचार्‍याला थोडे अस्वस्थ वाटू लागल्याने एका इंजेक्शनची गरज भासू शकते असे सांगीतले.मात्र ज्या रुग्णालयात हे कर्मचारी काम करतात तेथेही हे इंजेक्शन उपलब्ध नव्हते.श्रीरामपुरातही शोध घेऊन ते लवकर मिळेना.कोरोनाच्या काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येक कोरोना योद्धयाची गरज आहे,त्यांची प्रकृती ठणठणीत असणे महत्वाचे आहे.या भावनेतून प्रांताधिकारी पवार व तहसीलदार पाटील यांनी महसुलचे कर्मचारी पाठवून ते उपलब्ध केले तर.एवढेच नाही तर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी स्वतः त्याची किमंत ३२ हजार ४०० रुपये स्वतः चुकते केले.अन आरोग्य सेवेत काम करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी हे माझे कुटुंब असल्याची अनुभूती दिली आहे.या कर्मचार्‍यांना असा पाठीवर हात टाकून कृतिशील दिलासा मिळाल्याने त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close