जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील इनडोअर गेम हॉल मैदानातील अतिक्रमण काढण्याचा निर्णय !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील एस जी.विद्यालय रस्त्यालगत व पोहण्याच्या तलावाच्या उत्तरेस असलेल्या सर्व्हे नं.६७६७ मधील इनडोअर गेम हॉल मैदानातील मोठ्या प्रमाणावर वाढलेले अतिक्रमण काढण्याचा निर्णय आज सकाळी कोपरगाव नगरपरिषद मध्ये संपन्न झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले असल्याने अतिक्रमण धारकात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगावात विस्थापितांचा प्रश्न सुटत नसला तरी मात्र मोकळी मैदाने हि आपल्यासाठीच सरकारने अतिक्रमणासाठी राखीव ठेवली असल्याचा अनेक नागरिकांचा समज झालेल्या दिसत असून शासनही त्याला अपवाद नाही.कोपरगाव तहसीलच्या मैदानात पीपल्स बँकेच्या पश्चिमेस केंद्रीय जल आयोगाने नुकतेच तेथे कोपरगाव पालिकेची संमती नसताना अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करून पाहिला होता मात्र पालिका पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तो टळला होता.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगावात वर्तमानात अतिक्रमण धारकांनी मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले आहे.अनेक रस्त्यावर पुन्हा पथाऱ्या पसरलेल्या दिसत असून विस्थापित टपरीधारकांनीही अनेकवेळा पाठपुरावा करू अद्याप त्याना न्याय मिळालेला नाही.या बाबत केवळ निवडणुका पुरताच हा विषय तोंडी लावला जातो त्या नंतर पुन्हा राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांना त्याचा विसर पडतो असे अनेक वेळा झाले आहे.आता विस्थापितांना या फसवाफसवीचा कंटाळा आला आहे.मात्र कोपरगावात विस्थापितांचा प्रश्न सुटत नसला तरी मात्र मोकळी मैदाने हि आपल्यासाठीच सरकारने अतिक्रमणासाठी राखीव ठेवली असल्याचा अनेक नागरिकांचा समज झालेला दिसत असून शासनही त्याला अपवाद नाही.कोपरगाव तहसीलच्या मैदानात पीपल्स बँकेच्या पश्चिमेस केंद्रीय जल आयोगाने नुकतेच तेथे कोपरगाव पालिकेची संमती नसताना अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करून पाहिला मात्र नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी नुकताच तो हाणून पाडल्याची घटना जुनी झालेली नसताना कोपरगाव नगरपालिका हद्दीत इनडोअर गेम हॉल मैदानात ते आपला वारसा हक्क असल्याच्या थाटात काहींनी चक्क पक्की घरे बांधण्याचे धाडस केले असून पालिका नावाची प्रशासन यंत्रणेचा कुठलाही धाक नाही या थाटात ते केले गेले आहे. अनेकांना चारचाकी वहाने असताना त्यांनी हे अतिक्रमणाचे कृत्य केल्याची माहिती आहे.त्यामुळे नगरपरिषदेची त्याकडे वक्र दृष्टी वळाली असून आज सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान कोपरगाव पालिकेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक संपन्न झाली असल्याचे वृत्त असून त्यावेळी हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

त्यावेळी उपनगराध्यक्ष योगेश बागुल,भाजपचे गटनेते रवींद्र पाठक, आरोग्य सभापती अनिल आव्हाड, आरोग्य सभापती विद्या सोनवणे, भारती वायखिंडे,नगरसेवक मंदार पहाडे,रेखा काले आदी मान्यवर त्यावेळी उपस्थित होते.यावेळी प्रशासनास तातडीने पावले उचलण्यास सांगितलें आहे.मुख्या धिकारी प्रशांत सरोदे यांनी नोटिसा बजावण्याची तयारी केली असल्याचे समजते.त्यामुळे अतिक्रमित नागरिकांची बोबडी वळली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close