पाणी पुरवठा योजना
कोपरगाव तालुक्यातील अकरा पाणी योजनांना मंजुरी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांच्या रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळावी या पाठपुराव्याला यश मिळाले असून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेकडून तब्बल ११ गावच्या पाणी पुरवठा योजनांना १०.११ कोटीची प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
“कोपरगाव तालुक्यातील १ कोटीच्या पुढील कारवाडी १९८.८७ कोटी,धोत्रे १३१.४७ कोटी, नाटेगाव ११५.९७ कोटी,या योजनांचा समावेश असून त्याचबरोबर खिर्डी गणेश ९६.१६ लक्ष,डाऊच खु. ८९.१७ लक्ष,तळेगाव मळे ८१.०९ लक्ष,पढेगाव ६९.१० लक्ष, लौकी ६७.७५ लक्ष,अंचलगाव ५८.१५ लक्ष,बक्तरपुर ५५.५६ लक्ष,वडगाव ४७.२६ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे”-ना.आशुतोष काळे,अध्यक्ष,साई संस्थान शिर्डी.
मागील पाच वर्षात तालुक्यातील अनेक गावातील पाणी पुरवठा योजना रखडल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत होती.पाण्यासाठी महिलांची होणारी वणवण थांबविण्यासाठी निवडून आल्यापासून ना.काळे यांनी या गावातील पाणी योजनांना मंजुरी मिळविण्यासाठी असलेल्या अडचणी दूर करून पाठपुरावा सुरु होता.त्या पाठपुराव्यातून अनेक पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळाल्या आहेत.उर्वरित योजनांना मंजुरी मिळावी यासाठी त्यांचा आटापिटा सुरु होता.त्याला यश मिळाले असून एकूण ११ गावांच्या पाणी पुरवठा योजनांना १०.११ कोटी निधी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेकडून मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये तालुक्यातील १ कोटीच्या पुढील कारवाडी १९८.८७ कोटी,धोत्रे १३१.४७ कोटी, नाटेगाव ११५.९७ कोटी,या योजनांचा समावेश असून त्याचबरोबर खिर्डी गणेश ९६.१६ लक्ष,डाऊच खु. ८९.१७ लक्ष,तळेगाव मळे ८१.०९ लक्ष,पढेगाव ६९.१० लक्ष, लौकी ६७.७५ लक्ष, अंचलगाव ५८.१५ लक्ष,बक्तरपुर ५५.५६ लक्ष,वडगाव ४७.२६ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.त्यामुळे वरील गावातील अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला असून सर्व नागरिकांनी व महिला भगिनींनी त्यांचे आभार मानले आहे.११ गावांसाठी १०.११ कोटी निधी मंजुर केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील,पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ,जिल्हा परिषद अध्यक्षा ना.राजश्री घुले यांचे ना. काळे यांनी आभार मानले असून अजूनही ज्या गावांच्या पाणी पुरवठा योजना प्रलंबित आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.