कोपरगाव तालुका
कोपरगाव शहर राष्ट्रवादीची नूतन कार्यकारिणी घोषित
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारताच्या एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे.शरद पवार यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.आगामी काळात राज्यातील नगरपरिषदेच्या निवडणुका काही महिन्यावर आल्या असून या पार्श्वभूमीवर पक्षाने संघटन वाढविण्यास प्रारंभ केला आहे.त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव शहरातील पदाधिकाऱ्यांचे पद वितरण कार्यक्रम गौतम बँकेच्या आवारात आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला त्यावेळी हि घोषणा केली आहे.
आगामी नोव्हेम्बर मध्ये राज्यातील नगरपरिषदेच्या निवडणुका आल्या असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटन वाढविण्यास प्रारंभ केला आहे.त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव शहरातील पदाधिकाऱ्यांचे पद वितरण कार्यक्रम गौतम बँकेच्या आवारात आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला त्यावेळी हि घोषणा केली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,कार्याध्यक्ष संदीप कपिले,वाल्मिक लहिरे, विद्यार्थी कार्याध्यक्ष निखील डांगे, फकीर कुरेशी,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी,मागासवर्गीय सेल अध्यक्ष रावसाहेब साठे, कार्याध्यक्ष प्रकाश दुशिंग, युवक उपाध्यक्ष कृष्णा आढाव,मनोज कडू, सुनील बोरा,बाळासाहेब रुईकर,ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष प्रा.अंबादास वडांगळे, सोशल मिडीया अध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, सेवादल अध्यक्ष सचिन परदेशी, ओबीसी सेल अध्यक्ष राहुल देवळालीकर,कार्याध्यक्ष संतोष शेलार,विजय त्रिभुवन,राजेंद्र फुलपगार आदींसह सर्व सेलचे अध्यक्ष,पक्षाचे पदाधिकारी,नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी (विद्यार्थी शहराध्यक्ष) कार्तिक सरदार, (सांस्कृतिक तालुकाध्यक्ष) रमेश टोरपे, (उपाध्यक्ष) किशोर डोखे,अमोल गिरमे,राकेश शहा,विलास आव्हाड, शकील खाटिक,(सरचिटणीस) किरण बागुल, दिलीप पोटे, राजू उशिरे, रविंद्र सोनटक्के,शंकर घोडेराव,भाऊसाहेब लोहकरे, (संघटक) विजय बागडे, विलास ताम्हणे, रुपेश वाघचौरे,अमोल आढाव, मुन्ना पठाण,जनार्दन शिंदे,रविंद्र चिंचपूरे,राजू ठाकरे,शिवाजी कुऱ्हाडे,राजेंद्र वालझाडे,अल्ताफ पठाण, आक्रम शेख,अनिल परदेशी, कैलास महालकर,(चिटणीस) राजेंद्र राऊत,अशोक सोळसे,शकूर शेख आदी पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र आ. काळे यांच्या हस्ते देण्यात आले.नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ.काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहरातील घराघरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार पोहचविण्याचा निर्धार केला आहे.