जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यातील..त्या आरोपिंना न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलीस कोठडी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या महिलेने आपल्या पतीचा आपल्या भावाच्या मदतीने विजेच्या शॉक देऊन व नंतर चार पदरी दोरीने गळा आवळून आपलाच पती शिवनारायन नानाभाऊ संवत्सरकर याचा खून केल्याप्रकरणी आज कोपरगाव शहर पोलिसानी आज आरोपी पत्नी जयश्री संवत्सरकर व तिचा भाऊ किरण ढोणे यांना कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डोईफोडे यांच्या समोर हजर केले असता त्यानी दोन्ही बाजू ऐकून घेऊन आरोपींना पाच दिवसांची पोलिसांची कोठडी सुनावली आहे.

आज कोपरगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री डोईफोडे यांच्या समोर पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे यांनी आरोपी पत्नी जयश्री संवत्सरकर व तिचा भाऊ किरण ढोणे या दोघांना हजर केले असता त्यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला व त्यानंतर दि.२८ जून पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,आरोपी महिला जयश्री संवत्सरकर व मयत पती शिवनारायन यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून बेबनाव होता.मयत हा दारू पिऊन पत्नीला त्रास देण्याचे काम करत होता.त्यामुळे आरोपी पत्नी त्रस्त झाली होती.त्यामुळे तिने आधी याबाबत अनेक वेळा पतीला समजावून सांगितले होते.मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष करून आपला दारू पिऊन तिला चारित्र्याच्या संशयावरून त्रास देण्याचा उपद्रव सुरूच ठेवला होता.व तो तिचा काटा काढणार असल्याचा तिला संशय आल्याने तिने अखेर या पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी आपल्या हर्सूल येथील कारागृहात सेवेत असलेल्या भावाला बोलावून घेतले होते.व आधी आपल्या भावाच्या हि बाब आणून दिली होती.त्यातून हे कट कारस्थान शिजले होते.दरम्यान अशी संधी त्यांना रविवार दि.६ जून रोजी प्राप्त झाली होती.त्यांनी रात्रीच्या सुमारास आपल्या पतिला आधी केबलच्या सहाय्याने विजेच्या शॉक दिला त्या शॉक ने काही अंशी मृच्छित झाल्यावर त्याचा जीव गेलेला नाही हि जाणीव झाल्यावर त्याला चार पदरी दोरीच्या साहाय्याने गळफास दिला होता.व कोपरगाव शहर पोलिसांची दिशाभुल करण्यासाठी दारूच्या नशेत मयताने विजेच्या शॉक घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला होता.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी त्यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद क्रं.२९/२०२१ दाखल केली होती.मात्र पोलीस तपासात व मयताच्या वडिलांनी दिलेल्या जबाबात विसंगती आढळून आली होती त्या वरून तपासी अधिकाऱ्यांनी तपास केला असता हि खुनाची बाब उघड झाली होती.

या घटनेत मयताच्या बापाचा मयताचा खून हा मयताची पत्नी व तिचा भाऊ यांनीच केला असल्याचा जबाब महत्वपूर्ण ठरला आहे.त्यात कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गणबोटे यांनी दि.२२ जून रोजी दिलेल्या आपल्या अहवालात मयताचा मृत्यू हा गळा आवळून झाला असल्याचा अभिप्राय दिला होता.तो या प्रकरणात महत्वाचा ठरला होता.याबाबत पोलिसांनीं या बाबी निष्पन्न झाल्याने आरोपीना बेड्या ठोकल्या होत्या व आज कोपरगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री डोईफोडे यांच्या समोर पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे यांनी हजर केले असता त्यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला व त्यानंतर दि.२८ जून पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close