जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कामगार जगत

नगरपरिषद अधिकारी जिल्हा संघटनेच्या अध्यक्षपदी गोर्डे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा,नगरपंचायती,जिल्हा व विभागीय कार्यालयात महाराष्ट्र नगरपरिषद सेवेमध्ये कार्यरत असणार्‍या राज्य संवर्ग अधिकारी यांचे विविध प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांची सोडवणूक करण्याकरिता महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेची स्थापना करण्यात आली असून नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहिर झाली असून जिल्हाध्यक्षपदी कोपरगाव येथील उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांची नियुक्ती झाली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

“महाराष्ट्र नगरपरिषद सेवेमध्ये कार्यरत असणार्‍या राज्य संवर्ग अधिकारी यांचे विविध प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांची सोडवणूक करण्याकरिता महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे”-सुनील गोर्डे,नूतन जिल्हाध्यक्ष.

संघटनेच्या अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीची निवड प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली आहे.
यावेळी पुढीलप्रमाणे निवडी करण्यात आल्या.जिल्हाध्यक्ष सुनिल गोर्डे उपमुख्याधिकारी कोपरगांव न.प.,सचिव अमोल दातीर पाणी पुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता देवळाली न.प.,कार्याध्यक्ष कु.पल्लवी सूर्यवंशी कर व प्रशासकीय अधिकारी कोपरगांव न.प.,कोषाध्यक्ष सोमनाथ नारळकर लेखाधिकारी शेवगाव न.प.,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राम सरगर शहर (बांधकाम) अभियंता श्रीरामपुर न.प.,उपाध्यक्ष संभाजी कार्ले,अरुण तोगे,नानासाहेब टिक्कल,अभिजीत ताम्हाणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नगरपरिषद,नगरपंचायत स्तरावरील कार्यकारिणीचे अध्यक्ष हे जिल्हा कार्यकारिणीचे पदसिद्ध सदस्य आहेत. नवनियुक्त कार्यकारिणी संघटनेच्या माध्यमातून प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध राहतील असे आश्वासन यावेळी नूतन पदाधिकार्‍यांनी दिले आहे.

नूतन जिल्हा कार्यकारिणीचे कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वाहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,गटनेते विरेंन बोरावके,माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close