निधन वार्ता
साहेबराव आभाळे यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील प्रगतिशील शेतकरी साहेबराव दामोधर आभाळे यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते ६९ वर्षांचे होते.साईभक्त असणारे आभाळे धार्मिक कार्यात अग्रेसर होते.मढी खुर्दच्या माजी सरपंच वैशाली प्रमोदराव आभाळे यांचे ते श्वसुर होते.त्यांच्यामागे दोन मुले,एक मुलगी,तीन पुतण्या,चार पुतणे,सुना, नातवंडे असा परिवार आहे.
स्व.साहेबराव अभाळे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते.त्यांच्यावर मढी खुर्द येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.