जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज-तहसीलदार चंद्रे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात दिनांक २८ मे ते ३० मे या कालावधीत काही ठिकाणी वादळी वारा,मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली असल्याने आगामी काळात नागरिकांनी आपल्या जीवित व वित्तीय हाणीबाबत सतर्क राहावे असे आवाहन कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

“मुसळधार पाऊस पडत असताना तसेच सोसाट्याचा वारा वाहत असताना कोणीही पर्यटन स्थळी, नदी-नाले इ. ठिकाणी जावू नये,आपत्कालीन स्थितीत सेल्फी काढून नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये.हवामान विभागाकडून, जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करून जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी”-योगेश चंद्रे,तहसीलदार कोपरगाव.

त्यासाठी त्यांनी तालुयातील नागरिकांना खालील सूचना दिल्या आहेत त्या अशा,विजा चमकत असताना संगणक,टी.व्ही. इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत,दूरध्वनी,भ्रमणध्वनी चा वापर टाळावा,विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये,घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा,विजेच्या खांबांपासून लांब रहावे,विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये,विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास,गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे,धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात,तसेच या कालावधीत वाहणारा सोसाट्याचा वारा व मुसळधार पर्जन्यवृष्टी लक्षांत घेवून नागरिकांनी पुढीलप्रमाणे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे,मुसळधार पावसात व सोसाट्याच्या वा-यात घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस व वारा थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा,अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत व सोसाट्याचा वारा वाहत असताना सुरक्षित ठिकाणी राहा व प्रवास करू नका,पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये,मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष: क्र: १०७७ (टोल फ्री) ०२४१-२३२३८४४ वा २३५६९४० ला संपर्क करावा.हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imd.gov.in या संकेतस्थळावरून घ्यावी.कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका.कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्यावी किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष क्र.१०७७ (टोल फ्री) ०२४१-२३२३८४४ वा २३५६९४० या क्रमांकावर संपर्क साधून बातमीची खातरजमा करावी,आपत्कालीन स्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी आपण राहत असल्यास अतिवृष्टीच्या कालावधीत आपण जागरूक रहावे व प्रशासनास सहकार्य करावे,वाहणाऱ्या वाऱ्यामुळे किंवा तुरळक पावसामुळे शेत मालाचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घ्यावी व शेतमाल सुरक्षित स्थळी ठेवावा.पाळीव प्राण्यांसाठी व पक्ष्यांसाठी तयार करण्यात आलेले शेडची दुरुस्ती व वाऱ्यामुळे शेडचे पत्रे उडू नये यासाठी दक्षता घ्यावी.आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या बाबत जागरूक राहावे व योग्य ती दक्षता घेण्यात यावी,जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती,पूल इ. ठिकाणी जावू नये,कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना माहितीसाठी २४/७ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे.दूरभाष-०२४२३-२९५१५६,८४४६०३०४१५ असे आवाहनही तहसीलदार चंद्रे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close