जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात म्युकरमायकॉसिस वर मोफत उपचार करणार असल्याचा दावा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोविड-१९ महामारी उपचारा दरम्यान काही रुग्णांमध्ये दिसून येणाऱ्या म्युकरमायकॉसिस या बुरशीजन्य आजारावर अश्वमेध तर्फे कोपरगावकरांसाठी मोफत चिकित्सा व उपचार करण्याचा निर्णय अश्वमेधचे अध्यक्ष व प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी घेतला आहे.अती रसायनांचा वापर झाल्यानंतर बुरशीजन्य आजार मनुष्य,प्राणी,वनस्पती यांच्यामध्ये दिसून येत असतो.आणि योग्य वेळी योग्य निदान या आजाराचे आयुर्वेदिक चिकित्सेद्वारे झाल्यास आजार बरा होऊ शकतो.असा विश्वास अश्वमेध वैद्य डॉ. अशोक गावित्रे यांना वाटत असल्याचे म्हटले आहे.

“मार्च २०१९ मध्ये कोविड-१९ वर खात्रीशीर उपचार आपल्याकडे असल्याचे यावेळी डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी प्रिंट मीडिया व सोशल मीडियाद्वारे रुग्णांना आवाहन केले होते व त्याचा फायदा आजपर्यंत लाखो रुग्णांना झाला आहे.चीन मध्ये रुग्ण कमी होण्यामागील वनस्पती हि भारतातील वनस्पती अश्वमेधच्या ट्रीटमेंट मध्ये होती आणि चीनसह थायलंड,जपान,कोरिया तेथे रुग्ण कमी होण्यासाठी अश्वमेधच्या दाव्यातील वनस्पतींचाच उपयोग झाला आहे”डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे.

बुरशीरोधक क्षमता भारतीय वनस्पतींमध्ये यापूर्वीच आढळून आली आहे. आणि यापूर्वी पारंपारिक आजारांमध्ये अनेक वनस्पतींचा शास्त्रीय पद्धतीने वापर केल्याचे अनेक संशोधने प्रकाशीत झाले आहेत.म्युकरमायकॉसिस या बुरशीच्या वाढीसाठी डेक्स्ट्रोज,शुगर आणि वाढीव प्रथिने हे जवाबदार असतात. प्रयोगशाळेत अनेक बुरशीच्या वाढीसाठी यांचा वापर होत असतो.अगदी म्युकरमायकॉसिस जास्तीत जास्त डायबिटिक रुग्णांमध्ये आढळून येतो अशी माहिती पुढे आली आहे तर कोविडमध्ये व्हायरस मुळे प्रोटीन सिंथेसिस मोठ्या प्रमाणात होते.आणि हेच सूत्र हा आजार कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो असे मत डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले म्युकरमायकॉसिसच्या उपचारासाठी अश्वमेध मेडिकेअरने यापूर्वीच काही उत्पादनांची नोंदणी केली आहे त्याचा उपयोग रुग्णांना या विकारामध्ये होईल अशी खात्री आहे.
मार्च २०१९ मध्ये कोविड-१९ वर खात्रीशीर उपचार आपल्याकडे असल्याचे यावेळी डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी प्रिंट मीडिया व सोशल मीडियाद्वारे रुग्णांना आवाहन केले होते व त्याचा फायदा आजपर्यंत लाखो रुग्णांना झाला आहे.
चीन मध्ये रुग्ण कमी होण्यामागील वनस्पती हि भारतातील वनस्पती अश्वमेधच्या ट्रीटमेंट मध्ये होती आणि चीनसह थायलंड,जपान,कोरिया तेथे रुग्ण कमी होण्यासाठी अश्वमेधच्या दाव्यातील वनस्पतींचाच उपयोग झाला आहे. तसेच स्थानिक आरोग्य विभाग, मुंबई विद्यापीठ आणि अश्वमेध चे संशोधक यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड-१९ वरील पेटंट अश्वमेधने यापूर्वीच पब्लिश केले आहे.अश्वमेध चे प्रोटेक कफेक्स हि कोविड ट्रीटमेंट मधील प्रमुख उत्पादने यूरोप, रशिया येथे देखील नोंदणीचे काम अंतिम टप्प्यात असून त्याचा पुरवठा तिसऱ्या लाटे दरम्यान पाश्चात्य देशात लवकरच होईल.
म्युकर मायकोसिस ग्रेसीत कोपरगाव शहरातील जे रुग्ण असतील त्यांना या सेवेचा लाभ मोफत होणार असल्याचा दावा केला आहे.गरजूंनी खलील संपर्क नंबर वर फोन करून माहिती घ्यावी असे आवाहनही शेवटी डॉ.वाघचौरे यांनी केले आहे. 02423 223557, व 7768004545

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close