जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पिकअप मधून वाळूचोरी,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी ग्रामपंचायत हद्दीत गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचोरी करताना महिंद्रा कंपनीचा एक पिकअप (क्रं.एम.एच.-१५,बी.जे.२९८९) वरील अज्ञात चालक व त्याचा साथीदार महेश निवृत्ती मोरे हे दोघे आज सकाळी ०९.३० वाजेच्या सुमारास आढळून आले आहे.त्यांनी वाळू प्रतिबंधक पथकास चकमा देऊन परागंदा झाले असल्याची खबर फिर्यादी तलाठी सुशील राजेंद्र शुक्ला (वय-३४) रा.समतानगर कोपरगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

कोपरगाव महसूल विभागाचे अवैध वाळू नियंत्रक पथकास नुकतीच आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास मिळाली असता हे पथक मळेगाव थडी शिवारात अचानक गेले असता त्या ठिकाणी त्यांना एक ब्रास अवैध वाळू चोरी करताना एक पिवळ्या रंगाचा महिंद्रा पिकअप आढळून आला असता त्यांनी त्याचा पाठलाग केला असता त्याने या पथकास चकामा देऊन पोबारा केला आहे.

कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पात्रातून वैध वाळूचोरी करण्यास जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंध केलेला आहे.तरीही वाळूस मिळणारा सोन्याचा भाव पाहता अनेक वाळूचोरांना या अवैध वाळूचोरीचा सोस सुटत नाही.त्यात अनेकांनी आपले उखळ पांढरे केले आहे.अशीच घटना मळेगाव थडी शिवारात नुकतीच घडली असून महसूल विभागाचे अवैध वाळू नियंत्रक पथकास नुकतीच आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास मिळाली असता हे पथक मळेगाव थडी शिवारात अचानक गेले असता त्या ठिकाणी त्यांना एक ब्रास अवैध वाळू चोरी करताना एक पिवळ्या रंगाचा महिंद्रा पिकअप आढळून आला असता त्यांनी त्याचा पाठलाग केला असता त्याने या पथकास चकामा देऊन पोबारा केला आहे. या प्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१७७/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ पर्यावरण संवरक्षण कायदा कलम ३/१५ प्रमाणे वरील अज्ञात पिकअप चालक व त्याचा साथीदार महेश मोरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रदीप काशीद हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close