जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
खेळजगत

कुलदीप कोयटे याचे लक्षवेधी यश

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांवनजीक असलेल्या समता इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी कुलदिप संदीप कोयटे याने केयॉन विझकिड्स या नामांकित जागतिक पातळीवरील स्पर्धेत अंतिम दहा स्पर्धकांमध्ये स्थान मिळविल्याची माहिती स्कूलच्या प्राचार्या लिसा बर्धन यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोयटे याने सर्वसाधारण फेरी,वैयक्तिक फेरी,सादरीकरण, मुलाखत फेरी आणि अंतिम फेरी आदि फेऱ्यामधून आंतरराष्ट्रीय पातळीवरील परीक्षकांसमोर कला-गुणांचे सादरीकरण करत कुलदिप कोयटे याने कोपरगाव सारख्या तालुक्याबरोबरच जिल्हा,राज्य,देशाचे नेतृत्व करून कोपरगावचा झेंडा सातासमुद्रापार फडकविला आहे.

या बाबत अधिक माहिती देतांना त्या म्हणाल्या कि,‘केयॉन विझकिड्स हि एक नामांकित जागतिक संस्था असून या संस्थेतर्फे जगभरातील विद्यार्थ्यांसाठी मागील २० वर्षांपासून विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.या स्पर्धांमध्ये जगभरातील लाखो विद्यार्थी सहभाग घेतात हि स्पर्धा राष्ट्रीय आंतर शालेय असून विद्यार्थ्यांना विविध स्तरावर आपले सादरीकरण करावे लागते.विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी आंतर शालेय ते राष्ट्रीय स्तरांपर्यंत मजल मारावी लागते.या लाखो स्पर्धकांमधून राष्ट्रीय स्तरावर अंतिम स्पर्धेसाठी १० स्पर्धकांची निवड केली जाते.कुलदिप ची स्पर्धा ‘व्यक्तिमत्व स्पर्धा’या प्रकारात आहे. या प्रकारामध्ये शालेय शिक्षणा बरोबरच अंगभूत असणाऱ्या कला गुणांची दखल घेतली जाते.यामध्ये कुलदीपचे अभिनय कौशल्य,जतन केलेले छंद,आवड-निवड,स्वभाव,संभाषण कौशल्ये,सामाजिक मोहिमा,पथनाट्ये सादरीकरण,अभिनयाचे उत्कृष्ट सादरीकरण व वक्तृत्वावर असलेली पकड,संगीत कलेतील गिटार वाजविण्याची कला यांचा समावेश होतो.कोयटे याने सर्वसाधारण फेरी,वैयक्तिक फेरी,सादरीकरण, मुलाखत फेरी आणि अंतिम फेरी आदि फेऱ्यामधून आंतरराष्ट्रीय पातळीवरील परीक्षकांसमोर कला-गुणांचे सादरीकरण करत कुलदिप कोयटे याने कोपरगाव सारख्या तालुक्याबरोबरच जिल्हा,राज्य,देशाचे नेतृत्व करून कोपरगावचा झेंडा सातासमुद्रापार फडकविला आहे.

थायलंड येथे पार पडलेल्या स्कुबा ड्रायव्हिंग मधील सहभागासाठी कुलदीप चे नाव यापूर्वीच ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदविले गेले आहे. केयॉन विझकिड्स दरवर्षी जागतिक स्तरावर स्पर्धांचे आयोजन करते.त्यामध्ये संगीत,गायन,नृत्य,वक्तृत्व,सृजनशील लिखाण,अभिनय व्यक्तिमत्व या स्पर्धांचा समावेश होतो.

या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांचा नातू, समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती संदीप कोयटे व विश्वस्त संदीप कोयटे यांचा सुपुत्र आहे.समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्ष श्वेता भरत अजमेरे,कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा,सचिव प्रदीप साखरे,कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब,एसएसके वारड्रोबेच्या संस्थापिका सिमरन खुबाणी,समता इंटरनॅशनल स्कूल व्यवस्थापन समितीचे सदस्य,उपप्राचार्य.विलास भागडे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालक आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close