कोपरगाव तालुका
रक्तदान हे जीवनदान समजून सामाजीक चळवळ व्हावी-चैताली काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव(प्रतिनिधी)
रक्तदानामुळे दुसऱ्याचा आपण कठीण समयी जीव वाचवू शकत असल्याने रक्तदान हि मोठी सामाजिक जबाबदारी असल्याने तरुणांनी हि चळवळ जोमाने चालवली पाहिजे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना आज केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशिलामाई काळे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,येथे माजी आ. अशोक काळे यांच्या वाढदिवसानिमित्त व राष्ट्रीय सेवा योजनेच्या उदघाटन कार्यक्रमानिमित्त संजीवनी ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. विजया गुरसळ या होत्या.
त्या वेळी पुढे बोलताना म्हणाल्या की, आज तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरीही रक्त हे कोणत्याही प्रयोगशाळेत निर्माण करता आलेले नाही. नुकत्याच कोपरगाव तालुक्यातील महापुरामुळे अनेक साथीचे रोग पसरले आहेत. या आजारांमुळे अनेक रुग्णांच्या शरीरातील पांढऱ्या व तत्सम पेशी कमी झाल्याचे तपासणी मध्ये आढळून आले आहे. या रुग्णांना या पेशी केवळ रक्तातूनच मिळणार आहेत. त्यामुळे या रक्तदानाकडे आपण समाजसेवा म्हणून देखील पाहू शकतो. माजी आमदार अशोक काळे यांनी कोपरगाव तालुक्यात अनेक सामजोपयोगी कामे केली असून त्या समाजसेवेत आपलाही सहभाग व्हावा ही भावना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या वाढदिवसानिमित्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रक्तदान करावे असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
संजीवनी ब्लड बँकेच्या डॉ. निता पाटील यांनी रक्तदानाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सुभाष मुंदडा हे उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय प्रा. संतोष जाधव यांनी करून दिला तर या शिबिरामध्ये बहुसंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. विशाल पोटे व प्रा. उमाकांत कदम यांनी केले तर प्रा. विनोद मैंद यांनी आभार मानले.