कोपरगाव तालुका
प्रेरणा फाऊंडेशन आयोजीत साई चरित्र पारायण सोहळ्याची सांगता
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगांव शहरातील प्रेरणा फाऊंडेशन वतीने श्री.साई सतचरित्र पारायण सोहळा भाविक भक्तांच्या उपस्थितीत नुकताच मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, प्रेरणा फाऊंडेशन हि सामाजिक संस्था अध्यक्ष अॅड मनोज कडू यांनी स्थापन केली आहे. या संस्थेच्या वतीने अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जातात.साई चरित्र सोहळा हा असाच एक सामाजिक कार्यक्रम असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.त्या बाबत श्री.साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर यांनी साई चरित्र पारायण सोहळ्या बाबत बोलताना समाधान व्यक्त केले आहे.अशा उपक्रमांची समाजाला गरज असल्याचे सांगितले आहे.
सदर प्रसंगी बाबासाहेब गवारे,प्रकाश नरोडे,वाघ सर,महेश भागवत,अॅड गणेश मोकळं , छबुराव नजन ,अॅड.रश्मी कडू, संध्या भालेराव ,बाजीराव गवारे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
कोपरगांव शहरातील ५० स्त्री – पुरुषांनी या धार्मिक साई चरित्र पारायणात सहभाग घेतला होता. यावेळी साई साईचालरित्र पारायणामधे सहभागी लोकामधून भाग्यवान विजेते श्री बनकर व शिल्पा नारोडे यांना चांदीचे नाणे अॅड बाळासाहेब कडु यांच्या हस्ते देण्यात आले .सांगता समारंभात प्रेरणा फाउडेशन चे अध्य्क्ष अॅड.मनोज कडू यांनी प्रस्तापित करुन स्वागत केले व त्या प्रसंगी वृंदा कोऱ्हाळकर , अॅड.श्रध्दा जवाद , रत्ना पाठक , सुवालाल भंडारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.