जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

ओगदीत ३.१८ लाखांचा दरोडा,महिला जखमी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील ओगदी ग्रामपंचायत हद्दीत आज पहाटे १.४५ वाजेच्या सुमारास अज्ञात तीन दरोडेखोरांनी कमलबाई लक्ष्मण जोरवर (वय-४५) यांचे वस्तीवर दरोडा दरवाजावर दगडांचा भडिमार करून तो तोडला व घरातील ५० हजार रुपये रोख,जवळपास सहा तोळे सोन्या-चांदीचे विविध दागिने असा ३ लाख १८ हजारांचा ऐवज लंपास केला असून महिलेला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून जखमी केले असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी महिला आपली नेहमीची शेतीची कामे आटोपून व घराचे दरवाजाचे आतून बंद करून झोपी गेले असता त्यांच्या घरावर आज पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यानी घरावर हल्लाबोल केला.आधी त्यांनी या कुटुंबातील सदस्यांनी धाक दाखवून त्यांना दरवाजा उघडण्यास सांगून तसा प्रयत्न केला असता त्यांनी दाद दिली नाही त्याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्या लाकडी दरवाजावर मोठमोठाले दगड घालून दरवाजा तोडला व चोरी केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील ओगदी हे खेडे तालुक्याच्या व जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असून या भागात मोठ्या दळणवळणाची मोठी वानवा आहे.याच गावात फिर्यादी महिला कमलबाई जोरवर व त्यांचे कुटुंब आपल्या सर्व सदस्यासोबत राहाते. काल रात्री ते आपली नेहमीची शेतीची कामे आटोपून व घराचे दरवाजाचे आतून बंद करून झोपी गेले असता त्यांच्या घरावर आज पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यानी घरावर हल्लाबोल केला.आधी त्यांनी या कुटुंबातील सदस्यांनी धाक दाखवून त्यांना दरवाजा उघडण्यास सांगून तसा प्रयत्न केला असता त्यांनी दाद दिली नाही त्याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्या लाकडी दरवाजावर मोठमोठाले दगड घालून दरवाजा तोडला व घरातील रोख पन्नास हजारांची रोख रक्कम त्यात (२०००,५००,१०० दराच्या नोटा),६० हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे नेकलेस,६० हजार रुपये किमतीचा दीड तोळे वजनाचा एक दाणी सर,५० हजार रुपयांची सव्वा तोळे वजनाची सोन्याची पोत,३० हजार रुपये किमतीच्या ५०० ग्राम वजनाच्या चांदीच्या बाहुल्या,६० हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याची सोन्याची पोत,०४ हजार रुपये किमतीचे एक सोन्याचे ओम पान,०४ रुपये किमतीची एक ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी,असा एकूण ०३ लाख १८ हजार रुपये किमतीचा एकूण अवैज लंपास करून पोबारा केल्याने ओगदी व कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी फिर्यादी महिला कमलबाई जोरवर यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदींनी भेट देऊन चोरट्यांचा माग काढून आपल्या तपासाला गती दिली आहे.व विविध ठिकाणी आपली पथके रवाना केली आहे.

दरम्यान कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१४-२०२१ भा.द.वि.कलम ३९४,३९७,४५७,३४ प्रमाणे अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास शिर्डी उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close