कोपरगाव तालुका
राजकारण्यांवर दबाव असलेली पत्रकारिता असायला हवी-मुकुंद संगोराम

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमानात पत्रकार हे केवळ माहिती देत असून त्यांनी ज्ञान देण्याची गरज आहे.राजकारणी आणि पत्रकार यांच्यात समन्वय असण्यापेक्षा त्यांचा राजकारण्यांवर चांगले घडविण्यासाठी दबाव असायला हवा व पत्रकारांनी तशी पत्रकारिता करायला हवी अशी अपेक्षा लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी कोळपेवाडी येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
आम्हाला गोयंका सारखे लिहिण्याचे स्वातंत्र्य देणारे मालक भेटले आहे.मात्र जबाबदारीचे भान ठेवणाऱ्या पत्रकारांची मात्र वानवा आहे.आज कॉपी टू कॉपी आणि रेडिमेड पत्रकारिता वाढली असल्याची नेमकी टिपणी त्यांनी केली आहे.साखरेचे प्रश्न आणि ऊस शेती यांची जागतिक पातळीवरील सर्व माहिती येथील पत्रकांरांना असायला हवी-मुकुंद संगोराम,सहयोगी संपादक.
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आ.आशुतोष काळे यांनी पत्रकार दिनाचे आयोजन केले होते.त्या वेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.अशोक काळे हे होते.
सदर प्रसंगी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष पद्मकांत कुदळे,संचालक काकासाहेब जावळे,सुनील शिंदे,अशोक तिरसे,सचिन चांदगुडे,कारखाण्याचे महाव्यवस्थापक सुनील कोल्हे,सचिव सय्यद,व कोपरगाव व राहाता तालुक्यातील मुद्रित व इलेक्टरोनिक बहुसंख्य माध्यम पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”पत्रकारांनी आधी पाल्याला पत्रकार कशाला व्हायचे ते आधी ठरवले पाहिजे तर त्यास उद्देश मिळतो आज सर्व क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळालेल्या तज्ञांना विशेष मागणी आहे.आज उजव्या नाकपुडीने डॉक्टर डावी नाकपुडी तपासायला नकार देतात मग पत्रकारांनी एक अथवा तीन-चार आवडीचे विषय घेऊन पत्रकार व्हायला काय हरकत आहे.तो विषय विशेष प्रावीन्याने तडीस न्यायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करून अशा पत्रकारांचा आज अभाव असल्याचे निदर्शनास आणून दिले.१८२० साली बंगाल गॅझेट अस्तित्वात आले त्यानंतर दार्पणकार बाळ शास्त्री यांनी १८३२ साली दर्पण सुरू केले.आपण मुद्रित माध्यमात १९७६ आलो तेंव्हा केवळ तेच एकमेव माध्यम अस्तित्वात होते.पू.ल. देशपांडे यांनी दुरदर्शनची सुरुवात केली.आज देशभरात १२०० विविध बातम्या व करमणूक करणाऱ्या वाहिन्या आहेत.तर १३६ कोटीं नागरिकांच्या देशात दहा लाख वृत्तपत्रांची नोंद आहे.तरीही आज हि सर्व माध्यमे केवळ दहा कोटी लोकांपर्यंत पोहचतात.रोज वर्तमान पत्राचा आकार केला तर ते एक छोट्या आकाराचे चाळीस पाणी पुस्तक होईल व आज बालभारतीच्या पुस्तकांची किंमत जास्त आहे.मात्र वर्तमानपत्रांची किंमत चहा पॆक्षा कमी आहे तरी वाचक घटत चालला आहे.कोरोना काळात तो किमान पातळीवर पोहचला होता.आता तो काही अंशी वाढत आहे.हि समाधान देणारी बाब असली तरी काळ कठीण आहे.बातमी दिल्यावर पत्रकार समाधानी असला तरी संपादक मात्र रोजच आजच्या कामावर असमाधानी असल्याची कोपरखिळी मारली.पत्रकारांनी नेकीने काम केले तरच त्यांचा धाक राहील अन्यथा सर्व वृथा आहे.आज केवळ एक दोन वर्तमान पत्रे स्वाभिमानी राहिली असल्याचे वास्तव त्यांनी यावेळी मांडले आहे.आज वर्तमानपत्र आणि पत्रकार यांनी निर्भीड राहणे गरजेचे आहे.आज आम्हाला गोयंका सारखे लिहिण्याचे स्वातंत्र्य देणारे मालक भेटले आहे.मात्र जबाबदारीचे भान ठेवणाऱ्या पत्रकारांची मात्र वानवा आहे.आज कॉपी टू कॉपी आणि रेडिमेड पत्रकारिता वाढली असल्याची नेमकी टिपणी त्यांनी केली आहे.साखरेचे प्रश्न आणि ऊस शेती यांची जागतिक पातळीवरील सर्व माहिती येथील पत्रकांरांना असायला हवी असे सुनावले आहे.वर्तमान पत्रे हे माहिती देण्याकडून ज्ञान देण्याकडे गेली नाही तर ती आगामी काळात टिकणार नाही असा इशारा त्यानी दिला आहे.व चांगली बातमी करण्यासाठी कष्ट करण्याची तयारी असायला हवी व त्यासाठी इच्छाशक्ती असायला हवी.पत्रकारांनी चुकीला चूक म्हणण्याची क्षमता बाळगायला हवी.हि क्षमता कोपरगावात राहून कमवता आली पाहिजे.त्या साठी वर्तमान कामातील पारदर्शकता आणायला हवी असेही ते शेवटी म्हणाले आहे.
सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे यांनी मार्गदर्शन केले व प्रारंभी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी प्रास्तविक केले आहे.तर उपस्थितांचे आभार संचालक सचिन चांदगुडे यांनी मानले आहे.त्यावेळी उपस्थित पत्रकांरांचा सन्मान करण्यात आला आहे.