गुन्हे विषयक
कोपरगावात एकास विटाने मारहाण
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या वायव्येस साधारण तीन कि. मी. अंतरावर असलेल्या खडकी या उपनगरात रहिवाशी असलेल्या आरोपी गणेश बाबासाहेब पवार रा.खडकी याने मागील भांडणाच्या कारणावरून फिर्यादी संदीप रवींद्र अभंग (वय-३२) यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर विटाने व लाथा बुक्यांनी मारहाण करुन फिर्यादिस जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या बाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दि.तीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आरोपी गणेश पवार याने मागील भांडणाचे कारण देत फिर्यादी संदीप अभंग यास लाथा बुक्यांनी व विटाने मारहाण करून त्यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या बाबत फिर्यादी याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी संदीप अभंग व आरोपी गणेश पवार हे खडकी येथील रहिवाशी आहे.त्यांच्या काही दिवसापूर्वी भांडण झाले होते.मात्र मधला बराच काळ निघून गेला असताना दि.तीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आरोपी गणेश पवार याने मागील भांडणाचे कारण देत फिर्यादी संदीप अभंग यास लाथा बुक्यांनी व विटाने मारहाण करून त्यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या बाबत फिर्यादी याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी जखमी असून त्यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात व मानवता हॉस्पिटल येथे उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. तर आरोपी गणेश पवार हा घटना घडल्यानंतर फरार आहे.कोपरगाव शहर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी कोपरंगव शहर पोलीस ठाण्यात गु.र.क्रं.८०२/२०२० भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,प्रमाणे आरोपी गणेश पवार याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तापास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी. आर.तिकोणे हे करीत आहेत.