जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दुचाकी अपघातात एक ठार,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा चौफुली ते पुणतांबा रोडवर असलेल्या हौसाबाई गायकवाड यांच्या घरासमोर असलेल्या जागी दोन दुचाकीची (त्यात एक टी. व्ही.एस.कंपनीची व्हिक्टर क्रं.एम.एच.१७ सी.एफ.९४४६, व यामाहा कंपनीची दुसरी दुचाकी क्रं.एम.एच.१७ सी.जी.३८९०) धडक होऊन त्यात कोकमठाण येथील इसम रमेश जगन्नाथ देशमुख (वय-४०) यांचे निधन झाले आहे.

मयत रमेश देशमुख हे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना समोरून भरधाव वेगाने येणारी दुसरी यामाहा कंपनीच्या दुचाकीने जोराची धडक देऊन त्यानां जखमी केला असता हि बाब नजीकच्या नागरिकांनी त्यांच्या घरातील नातेवाईकांच्या लक्षात आणून दिली असताना त्यांचे भाऊ सुनील जगन्नाथ देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याना प्रथम शिर्डी येथील साईबाबा रुग्णालय येथे भराती केले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याना नाशिक येथील रुग्णालयात भरती करण्यास सांगितले असता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील रहिवाशी असलेले मयत हे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना समोरून भरधाव वेगाने येणारी दुसरी यामाहा कंपनीच्या दुचाकीने जोराची धडक देऊन त्यानां जखमी केला असता हि बाब नजीकच्या नागरिकांनी त्यांच्या घरातील नातेवाईकांच्या लक्षात आणून दिली असताना त्यांचे भाऊ सुनील जगन्नाथ देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याना प्रथम शिर्डी येथील साईबाबा रुग्णालय येथे भराती केले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याना नाशिक येथील रुग्णालयात भरती करण्यास सांगितले असता त्यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अपयश आले आहे.त्यांच्यावर उपचार करताना त्यांचे दि.२१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.१५ वाजता निधन झाले आहे.

दरम्यान या बाबत मयताचे बंधू सुनील देशमुख यांनी या प्रकरणी यामाहा या दुसऱ्या दुचाकी वरील स्वार आरोपी संतोष सदाशिव सूर्यवंशी रा.गांधीनगर,कोपरगाव यांचेविरुद्ध रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने आपल्या ताब्यातील वाहन चालवून मयताच्या मृत्यूस कारणीभूत झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी गु.र.क्रं.७९४ -२०२० भा.द.वि.कलम ३०४(अ)२७९,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४-१७७ प्रमाणे वरील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनांखाली पो.नाईक ए. एम.दारकुंडे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close