जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

आता कोपरगावाच्या ग्रामीण भागात रुग्णवाढ !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात गत तीन दिवसात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठला असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण १४७ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ३५ बाधित आढळले आहे.तर १८ संशयित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडून दिले आहे. तर खाजगी प्रयोग शाळेतील ०६ तर नगर येथील प्रयोग शाळेतील ०१ असे एकूण बाधित ३५ रुग्ण आढळले असून नगर येथे तपासणी साठी २० स्राव पाठविले असल्याची माहिती दिली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.दरम्यान आता एकूण बाधित ३५ रुग्णांत ग्रामीण भागात १८ तर शहरात १७ रुग्ण वाढ झाल्याने शहरात आता रुग्ण वाढ नियंत्रणात आलेली दिसत आहे मात्र ग्रामीण भागात जोर वाढलेला दिसत आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ३५ हजार ६७६ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ५६९ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून २६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत तीन दिवसात दोन बळी गेल्याने त्यामुळे अधिकची चिंता वाढली आहे.

आज आलेल्या यादीत शहरात १७ बाधित रुग्णांची संख्या तर ग्रामीण भागात १८ असे ३५ रुग्ण बाधित निघाले आहे तरी एकूण रुग्ण संख्या पाहता नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

आज कोपरगाव ग्रामीण भागात आढळलेल्या उर्वरित बाधित रुग्णांची यादी पुढील प्रमाणे-

खोपडी पुरुष वय -३६, कोळगाव थंडी पुरुष वय-६०,व महिला वय-५३, शिंगवे पुरुष वय-३५,साकरवाडी पुरुष वय-४८, मंजूर पुरुष वय-३७, उक्कडगाव पुरुष वय -४३,व महिला वय-४५,३९,३२,जेऊर कुंभारी पुरुष वय- ४९,ब्राम्हणगाव पुरुष वय-७०,रवंदे पुरुष वय-६०, व महिला वय-३०,टाकळी पुरुष वय-५८, व ५० कोळपेवाडी पुरुष वय-६५,संजीवनी कारखाना आदीं १८ रुग्णांचा समावेश आहे.
तर शहरातील आढळलेले रुग्ण पुढील प्रमाणे-सुभद्रानगर पुरुष वय-३८,२८,कर्मवीर नगर पुरुष वय-२६,२३, शंकरनगर पुरुष वय-३७, लक्ष्मीनगर पुरुष वय-४८,रिद्धीसिद्धीनगर महीला वय-३८, कोपरगाव पुरुष वय-३८, साईसिटी महिला वय-३७, गोकुळनगरी पुरुष वय-५८, मोहिनिराजनगर पुरुष वय-२८,गजानननगर पुरुष वय-३४,सिद्धी विनायक कॉलनी महिला वय-२९, ओमनगर पुरुष वय-४०, व महीला वय-३९,कापड बाजार पुरूष वय-३०,६५ आदीं १७ रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०१ हजार ५४८ इतकी झाली आहे.त्यात १८२ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत २६ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.६७ टक्के आहे.आतापर्यंत ०६ हजार ५७१ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला २६ हजार २८४ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २३.५५ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या १३४० इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८६.५६ टक्के झाला आहे.दरम्यान या मोठ्या बाधित आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली असली तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close