जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अपघातग्रस्त मालेगाव-पुणे रस्ता सिमेंटचा करा-मागणी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नगर-मनमाड या राज्य मार्ग अत्यंत खराब झाल्याने या मार्गावर वर्तमानात मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन अनेकांची जीवित व वित्तीय हानी होत असल्याने
हा रस्ता तातडीने दुरुस्त होणे गरजेचे आहे,केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे अत्यंत धडाकेबाज मंत्री असल्याने त्यांनी हे काम त्वरित हाती घेऊन नागरिकांचे प्राण वाचवावे असे आवाहन कोपरगाव येथील जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केले आहे.

या परिसरातील जागतिक पातळीवरील देवस्थान म्हणून शिर्डी येथील श्री साईबाबा यांची ख्याती आहे,तसेच शनी शिंगणापूर हे देवस्थान सुद्धा देशात प्रसिद्ध आहे.कोपरगावातील अनेक तीर्थक्षेत्र आहेत.प्रेक्षणीय स्थळे सुद्धा आहेत पण दळणवळणाची सोय नसल्याने लोक यायला धजावत नाही.आपण हा महामार्ग जर मनांवर घेतला तर अनेक प्रश्न मार्गी लागू शकतील.या परिसरात रोजगार वाढू शकतो-राजेश परजणे

त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,”साऱ्या देशाला व आपल्या राज्याला माहीत आहे की आपण एक धडाकेबाज मंत्री आहात.युतीच्या काळातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेले उड्डाणपूल,मुंबई-पुणे जलद महामार्ग अशा अनेक कामाची नागरिकांना आजही आठवण आहे.वर्तमानात देशात रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत आपण स्वतः दक्ष आहात.आपण मालेगाव-पुणे हा राज्य महामार्ग गुजरात मधील अहमदाबाद महामार्गा प्रमाणे सिमेंटचा केल्यास या मार्गावर निष्पाप नागरिकांचे रोज जाणारे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.यात रोज निष्पाप लोक मारले जात आहे.अनेक रुग्ण रस्त्यातील खड्यांमुळे प्राण सोडत आहेत.जेष्ठ नागरिकांना अनेक नरक यातना भोगाव्या लागत आहेत त्यानां अतोनात यातना सहन कराव्या लागत आहे.शेतकरी वर्गाला सुद्धा आपला मालाची वाहतूक करण्यास अडचणी येत आहेत.शाळकरी मुलांची गैरसोय मोठया प्रमाणात होत आहे.जागतिक पातळीवरील देवस्थान म्हणून शिर्डी येथील श्री साईबाबा यांची ख्याती आहे,तसेच शनी शिंगणापूर हे देवस्थान सुद्धा देशात प्रसिद्ध आहे.कोपरगावातील अनेक तीर्थक्षेत्र आहेत.प्रेक्षणीय स्थळे सुद्धा आहेत पण दळणवळणाची सोय नसल्याने लोक यायला धजावत नाही.आपण हा महामार्ग जर मनांवर घेतला तर अनेक प्रश्न मार्गी लागू शकतील.या परिसरात रोजगार वाढू शकतो.अनेक नवीन उद्योग-व्यवसाय निर्माण होऊ शकतात.वर्तमानात राज्यात अनेक रस्ते केंद्राच्या मदतीने चालू आहेत.हा मार्ग आपण मनावर घेतल्यास बनवणे अशक्य नाही.आपण कृपया याबद्दल तातडीने कार्यवाही करावीअसे आवाहनही राजेश परजणे यांनी शेवटी केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close